Vanita Kharat: `महाराष्ट्राची हास्यजत्रा` फेम वनिता खरातच्या मंगळसूत्राची डिझाईन पाहिलीत का?
नुकतीच वनिताच्या घरी सत्यनारायणाची पुजा पार पडली. त्यावेळी वनितानं घातलेल्या मंगळसूत्रानं (Mangalsutra) सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Vanita Kharat Wedding: महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्री वनिता खरात हिचा नुकताच विवाहसोहळा पार पडला आहे. 2 फेब्रुवारीला वनिता खरातनं आपला प्रियकर सुमित लोंढेसोबत तिनं लग्न केले. लग्नाच्या काही दिवसांपुर्वीच तिचे हटके प्री-वेडिंग फोटोशूट हे व्हायरल झाले होते. वनिता तिच्या आयुष्याशी एक नवी सुरूवात केली आहे. हा लग्नसोहळा मित्रपरिवार आणि नातेवाईकांच्या साक्षीनं पार पडला. वनिताच्या लग्नाचे आणि रिसेप्शनचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. (Maharashtrachi Hasyajatra Fame vanita kharat shares an adorable pic after her wedding mangalsutra photo goes viral)
नुकतीच वनिताच्या घरी सत्यनारायणाची पुजा पार पडली. त्यावेळी वनितानं घातलेल्या मंगळसूत्रानं (Mangalsutra) सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले आहे. काल म्हणजेच 4 फेब्रुवारीला सुमितच्या घरी सत्यनारायणाची पुजा पार पडली. त्या पूजेवेळी त्या दोघांचा पारंपारिक सगळ्यांचेच लक्ष वेधून घेत होता. लग्नात त्या दोघांचा उखाणाही खूप लोकप्रिय झाला होता.
पुजेच्या वेळी घेतला उखाणा -
सत्यनारायण पुजेच्या वेळी वनितानं खास उखाणा (Ukhana) घेतला. 'आमच्या कोकणात फेमस आहे कापा आणि बरका फणस, आमच्या कोकणात फेमस आहे कापा आणि बरका फणस... सुमित रावांचं नाव घेते आज आहे पुजेचा दिवस'. तिच्या या उखाण्यावर अनेकांना कमेंट्सही केल्या होत्या.
वनिताचा हटके लुक -
वनितानं यावेळी हिरव्या रंगाची साडी आणि लाल रंगाचा ब्लाऊज घातला होता त्याचबरोबर गळ्यात पारंपारिक दागिने आणि कपाळाला मुंडावळ्या होत्या. तर सुमितनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता आणि त्यावर लाल रंगाचा पैठणी शैली परिधान केला होता. परंतु यावेळी दोघांनी परिधान केलेल्या मराठमोळ्या लुकपेक्षा (Wedding Look) त्यांच्या चाहत्यांचे लक्ष वनिताच्या मंगळसूत्रानं वेधले होते. हे मंगळसूत्रही मध्यतंरी होणार सून... या मालिकेतील जान्हवीप्रमाणे आहे का असाह शोध घेण्यास चाहत्यांनी सुरूवात केली होती.
कोण आहे वनिताचा नवरा?
सुमित हा एक व्हिडीओ क्रिएटर आहे. वनिता आणि सुमित एका सहलीला एकत्र भेटले होते. तेव्हापासून ते दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. या पिकनिकलाच त्यांची घट्ट मैत्री झाली होती. त्यानंतर त्यांनी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला.