Prasad Khadekar Real Life Wife: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका गेली पाच वर्षे आपले मनोरंजन करताना दिसते आहे. त्यामुळे या मालिकेची सर्वत्र चर्चा आहे. या मालिकेतून आपल्यासमोर 'शिवाली, भोवली, अवली, पावली कोहली' ही पात्रं आली आणि त्यांच्या स्किटनं आपल्या सर्वांनाच खळखळून हसवलं आहे. या मालिकेतून आपलं मनोरंजन करण्यासाठी हे चारही जणं पुरता धुमाकूळ घालत असतात. अभिनेता प्रसाद खांडेकर, नम्रता आवटे, शिवाली परब आणि प्रियदर्शनी इंदलकर यांच्या फॅन फॉलोईंगमध्येही बरीच वाढ झाली आहे. अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिनं सुबोध भावे सोबत नुकत्याच 'ती फुलराणी' या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. शिवाली परबही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या चौघांच्याही भुमिका या प्रचंड गाजल्या आहेत. परंतु या स्किटमधून स्वार्धिक लक्षात राहते ती म्हणजे प्रसाद खांडेकर यांची 'अवली कोहली' ही भुमिका. त्यांच्या पत्नीची भुमिका नम्रता आवटे करते. पावली कोहली म्हणून ही भुमिका चांगलीच लोकप्रिय आहे. परंतु अवलीच्या खऱ्या आयुष्यातील बायकोला तुम्ही पाहिले आहेत का? खऱ्या आयुष्यात प्रसाद खांडेकर यांची पत्नीही खूप सुंदर दिसते. प्रसाद खांडेकर ही सोशल मीडियावरही चांगलेच लोकप्रिय असतात. ते इन्टाग्रामवरूनही आपले सर्व अपडेट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. 


हेही वाचा - रॅपरनं वाढदिवसाला नग्न स्त्रियांच्या अंगावर सर्व्ह केली सुशी; नेटकरी संतापले


प्रसाद खांडेकर यांच्या पत्नीचे नाव अल्पा खांडकेर असे आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, अल्पा यांचा स्वत:चा व्यवसाय आहे. त्या केक आणि चॉकलेट्स बनवतात आणि त्यांचा व्यवसाय करतात. त्या तशा ऑर्डर्स घेतात. इन्टाग्रामवर प्रसाद खांडेकर हे आपले फॅमिली फोटोही शेअर करताना दिसतात. आपल्या पत्नी आणि मुलासह ते अनेक फोटो शेअर करताना दिसतात. प्रसाद खांडेकर यांनी अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांतूनही कामं केली आहे. त्यांच्या इन्टाग्राम पोस्टही कायमच चर्चेत असतात. त्यामुळे चाहतेही त्यांच्या पोस्टवर कमेंट्स आणि लाईक करताना दिसतात. सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ची सर्वत्र चर्चेत आहे. मराठीच काय तर इतर भाषेतील प्रेक्षकही ही मालिका अगदी आवर्जून पाहताना दिसतात. अनेकजण न चुकता हा शो पाहतात. 



अभिनेते प्रसाद खांडेकर आपली पत्नी अल्पा खांडेकर यांच्यासह (फोटो सौजन्य : प्रसाद खांडेकर | इन्टाग्राम)


मध्यंतरी अमिताभ बच्चन यांनी स्वत:हून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे कौतुक केले होते. खुद्द बीग बी अमिताभ बच्चन हे समीर चौगुले यांच्या पाया पडले होते याबद्दलचा फोटोही मध्यंतरी खूप व्हायरल झाला होता. समीर चौगुलेंना या फोटोबद्दल प्रचंड प्रतिक्रिया आल्या होत्या.