रॅपरनं वाढदिवसाला नग्न स्त्रियांच्या अंगावर सर्व्ह केली सुशी; नेटकरी संतापले

Kayne West Serves Sushi on Women Naked Body: हल्ली आपल्या वाढदिवसानिमित्त कोण काय करेल याची काहीच कल्पना नाही. आता अशाच एका अमेरिकन रॅपरनं नुसता कहर केला आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या पार्टीत त्यानं असं कृत्य केलं की नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 13, 2023, 05:38 PM IST
रॅपरनं वाढदिवसाला नग्न स्त्रियांच्या अंगावर सर्व्ह केली सुशी; नेटकरी संतापले title=
June 13, 2023 | Rapper Kayne West gets trolled after serving sushi on womans body (Photo: Zee News)

Kayne West Birthday Party: हल्ली आपल्याला कुठे, कधी काय ऐकायला मिळेल याचा काहीच नेम नाही. कधी कोण काय करेल याचाही काही नेम नाही. आपला वाढदिवस खास करणं हा सगळ्यांचाच अधिकार आहे. परंतु आपल्या वाढदिवशी अतिउत्साहाच्या भरात कोण कसं सेलिब्रेशन करेल याचाही आजकाल काही नेम राहिलेला नाही. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. ज्यात आपल्या वाढदिवसानिमित्त लोकं नाना तऱ्हेचे प्रयोग करतात. अनेकदा त्यांची फजिती होते तर अशाप्रकारे वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी वापरण्यात येणारा फंडा अनेकांच्या जीवावरही बेततो. परंतु आपल्या वाढदिवसाला असाच एक विचित्र प्रकार एका रॅपरनं केला आहे. जो ऐकून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. 

आजकाल आपल्या वाढदिवसाचा इव्हेंट केला जातो. अनेक सेलिब्रेटीही आपल्या वाढदिवसानिमित्त मोठ्या स्तरावर पार्टी करताना दिसतात त्यामुळे त्यांची बरीच चर्चा रंगते. आता अशाच एका सेलिब्रेटीनं आपल्या वाढदिवसानिमित्त पुरता कहर केला आहे. त्याच्या या विक्षिप्त कृतीकडे पाहून नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं आहे. सध्या सेलिब्रेटी आपल्या अशा विक्षिप्त कृतीमुळे कायमच चर्चेत असतात. त्यातून समोर आलेल्या या बातमीनं सगळीकडे धुमाकूळ घातला आहे. तुम्ही म्हणाल इतकं नक्की काय घडलंय? तेव्हा आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत या घडलेल्या प्रकाराबद्दल! 

हेही वाचा - टिक्वलनं जबरदस्ती आई डिंपल कापाडियाला करायला सांगितलं 'ते' काम, म्हणाली, ''पैसे हवेत ना मग...''

अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट यानं आपल्या वाढदिवसानिमित्त चक्क नग्न महिलांच्या अंगावर सुशी ठेवून पार्टीत आलेल्या मित्रमैत्रीणींना सर्व्ह केलं आहे. त्याचा या कृत्यामुळे त्याच्यावर ट्रोलर्सनी सपाटून टीका केली आहे. वाढदिवस आहे म्हणून काहीही करायचं का अशा भाषेत नेटकऱ्यांनी त्याची शाळा घेतली आहे. त्याचे हे वागणे कोणालाच रूचलेले नाही. सध्या त्याच्या या पार्टीतले इनसाईड फोटोज हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्याला चांगलेच खडेबोल सुनावले आहे. 'पोप क्रेव्ह' नावाच्या ट्विटर हॅन्डलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. त्यामुळे हे फोटोज सध्या सगळीकडेच व्हायरल होताना दिसत आहे. 

या फोटोत तुम्ही पाहू शकता की, एका टेबलावर नग्न स्त्री झोपलेली आहे आणि तिच्या अंगावर सुशी सर्व्ह केलेली दिसते आहे. त्या टेबलावरही सुशी सर्व्ह केल्याचे दिसून येते. कान्ये वेस्ट हा अमेरिकन रॅपर आहे. त्याच्या गाण्याची कायमच चर्चा होताना दिसते. त्यामुळे आता त्याच्या वाढदिवसानिमित्त तो चांगलाच चर्चेत आला आहे.