Maharashtrachi Hasyajatra Shivali Parab On Date : छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा कार्यक्रम लोकप्रिय कॉमेडी शो पैकी एक आहे. या शोनं प्रेक्षकांना भूरळ घातली आहे. या शोचे फक्त भारतात नाही तर परदेशातही लाखो चाहते आहेत. प्रेक्षक हा शो नेहमीच आनंदानं पाहत असतात. या कार्यक्रमातील कलाकारांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर शोमधील अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) ही सध्या चर्चेत आली आहे. शिवालीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या पोस्टमुळे ती चर्चेत आली आहे. इतकंच काय तर शिवालीनं ती कोणासोबत डेटवर गेली आहे. ते देखील सांगितलं आहे. तिच्या या पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवालीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये शिवालीनं एका मुलाचा फोटो शेअर केला आहे. आता हा मुलगा कोण असा प्रश्न तुम्हाला नक्कीच आला असेल. शिवालीनं अभिनेता निमिश कुलकर्णीचा (Nimish Kulkarni) हा फोटो शेअर केला आहे. शिवाली आणि निमिशचा हा फोटो पाहिल्यानंतर ते दोघं डेटवर गेल्याच्या चर्चा सुरु झाल्या. पण स्वत: शिवालीनं निमिशचा फोटो शेअर करत 'माझ्या निब्बाबरोबर डेट' त्यासोबत #cutebaby असे कॅप्शन देखील दिले आहे. 



निमिश विषयी बोलायचे झाले तर स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. दरम्यान, शिवालीचा काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओ कोहली कुटुंब आपण सगळ्यांनी पाहिलं. त्यांच्या या व्हिडीओवर अनेक मजेशीर रील बनवण्यात आले होते. त्यांच्या या रीलनं प्रेक्षकांची मने जिंकली होती. तर सगळ्यांना हसू अनावर झालं होतं. दिवसेंदिवस शिवालीच्या चाहत्यांच्या संख्या वाढताना दिसत आहे. 


हेही वाचा : किच्चा सुदीपने भाजपात प्रवेश केल्यानंतर कट्टर विरोधक प्रकाश राज यांना धक्का, म्हणाले "मला फार..."


काही दिवसांपूर्वी शिवाली परब ही 'म्याड केलंस तू' या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली होती. या गाण्याचा व्हिडीओ व्ही.आर. म्युझिक या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाला होता. हे गाणं 'म्याड केलंस तू' या शब्दात त्यांच्या प्रेमाची कबूली देत आहे. तरुणांना या गाण्यानं वेड लावलं होतं. या गाण्यानं सगळ्यांना भुरळ पाडली असून रसिकांचे मनोरंजन करताना दिसत आहे. जेव्हा पासून गाण्याचा टीझर प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून या गाण्याची सगळीकडे चर्चा सुरु झाली होती. इतकंच काय तर प्रेक्षक शिवालीला या गाण्यात पाहण्यासाठी उस्तुक होते. ते गाणं जेव्हा प्रदर्शित झालं तेव्हा सगळ्यांना खरंच त्या गाण्यानं वेड लावलं होतं. दरम्यान, या गाण्यात शिवालीसोबत खानदेशातील विशाल राठोड दिसत आहे. सीएम राठोड यांनी गाण्याच्या निर्मिती केली आहे.