किच्चा सुदीपने भाजपात प्रवेश केल्यानंतर कट्टर विरोधक प्रकाश राज यांना धक्का, म्हणाले "मला फार..."

Prakash Raj on Kichcha Sudeep: प्रसिद्ध कन्नड अभिनेता किच्चा सुदीपने (Kichcha Sudeep) भाजपाला (BJP) पाठिंबा जाहीर केल्यानंतर प्रकाश राज (Prakash Raj) यांना धक्का बसला आहे. याआधी प्रकाश राज यांनी किच्चा सुदीप भाजपा प्रवेश करणार असल्याचं वृत्त खोटं असल्याचा दावा केला होता.   

शिवराज यादव | Updated: Apr 5, 2023, 07:42 PM IST
किच्चा सुदीपने भाजपात प्रवेश केल्यानंतर कट्टर विरोधक प्रकाश राज यांना धक्का, म्हणाले "मला फार..." title=

Prakash Raj on Kichcha Sudeep: कन्नड अभिनेता किच्चा सुदीपने (Kichcha Sudeep) भाजपामध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कर्नाटकमधील आगामी निवडणुकीत (Karnataka Election) आपण भाजपासाठी (BJP) प्रचार करणार असल्याचं किच्चा सुदीपने जाहीर केलं आहे. त्याने राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह पत्रकार परिषदही घेतली. दरम्यान किच्चा सुदीपच्या या निर्णयामुळे भाजपाचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे अभिनेता प्रकाश राज (Prakash Raj) यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांनी आपली नाराजीही जाहीर केली आहे. 

किच्चा सुदीप आता भाजपाचा सदस्य आहे. 5 एप्रिलला त्याने भाजपामध्ये अधिकृत प्रवेश केला. आपण फक्त भाजपाच्या प्रचारात सहभागी होणार असल्याचं त्याने सांगितलं आहे. आपण निवडणूक लढणार नसल्याचा त्याचा दावा आहे. मात्र त्याच्या या निर्णयामुळे प्रकाश राज मात्र दुखावले आहेत. 

किच्चा सुदीपच्या विधानामुळे प्रकाश राज दुखावले

किच्चा सुदीपने अधिकृतपणे भाजपात प्रवेश करण्याआधी अनेक माध्यमांनी सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं होतं. त्यावेळी प्रकाश राज यांनी ही बातमी खोटी असल्याचा दावा केला होता. त्यामुळेच जेव्हा हे वृत्त खरं ठरलं तेव्हा त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. "मी फक्त भाजपासाठी प्रचार करणार आहे. मी निवडणूक लढणार नाही," असं किच्चा सुदीपने पत्रकारांशी बोलताना सांगितलं. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह त्याने पत्रकार परिषदही घेतली. यावेळी त्याने बोम्मई हे कोणत्या पक्षात आहेत याला महत्त्व न देता, मी त्यांना पाठिंबा देत राहणार आहे असं किच्चा सुदीपने सांगितलं. 

किच्चा सुदीपच्या या विधानानंतर प्रकाश राज यांनी आपण दुखावलो असून, धक्का बसला असल्याचं म्हटलं आहे. 

याआधी प्रकाश राज यांनी किच्चा सुदीपच्या भाजपा प्रवेशाच्या वृत्तावर ट्विट करत म्हटलं होतं की "कर्नाटकात पराभवाच्या भीतीने ही पूर्णपणे खोटी बातमी पसरवण्यात आली आहे याचा मला विश्वास आहे. किच्चा सुदीप फार समतूदार नागरिक असून याला बळी पडणार नाही".

किच्चा सुदीपचा भाजपात प्रवेश

किच्चा सुदीपने मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने सांगितलं की, "मी माझ्या उपकारांची परतफेड अशाप्रकारे करतो. हे पक्षाशी संबंधित नाही... असे अनेक लोक आहेत ज्यांनी मला आयुष्यभर साथ दिली आणि त्यापैकी एक म्हणजे मुख्यमंत्री बोम्मई आहेत. आज येथे त्यांच्यासाठी येत आहे, पक्षासाठी नाही. मी त्यांना सांगितले आहे की त्यांच्या फायद्यासाठी मी येथे भाजपाचा प्रचार करायला आलो आहे".