Prajakta Mali Birthday Celebration with Maharashtra Hasyajatra Team: अभिनेत्री प्राजक्ता माळी ही आपल्या सर्वांचीच लाडकी अभिनेत्री आहे. सोशल मीडियावरही ती खूप जास्त सक्रिय असते. नुकताच तिनं आपला वाढदिवस साजरा केला आहे. आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा ही मालिका प्रचंड गाजली आहे. त्यातून काही महिन्यांसाठी या लोकप्रिय मालिकेनं ब्रेक घेतला होता. त्यामुळे प्रेक्षक थोडेसे निराश झाले होते. परंतु आता नव्या ढंगात आणि नव्या रूपात ही महाराष्ट्राची लाडकी स्ट्रेस फ्री करणारी मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येते आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामुळे आता या मालिकेतून प्रेक्षकांचे लाडके कलाकारही त्यांच्या भेटीला येणार आहेत. सोबत तुमची लाडकी प्राजूही सुत्रसंचालनाच्या भुमिकेमधून दिसणार आहे. सध्या प्राजक्ताच्या खास बर्थडे सेलिब्रेशनचे फोटोही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावेळी महाराष्ट्राच्या हास्यजत्रेतील कलाकारांनी प्राजक्ताचा वाढदिवस साजरा केला. यावेळी सगळेच फारच आनंदी आणि उत्साही वाटत होती. यंदा नेटकऱ्यांनाही ही संपुर्ण टीम एकत्र पाहून फारच आनंद आहे. 


हेही वाचा - अभिनेत्री जया प्रदा यांना तुरूंगवास; कर्मचाऱ्यांचे पैसे बुडवल्यानं 6 महिन्यांची कोठडी


2018 पासून 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करते आहे. फक्त मराठी प्रेक्षकचं नाहीत तर भारतीय आणि भारताबाहेरील प्रेक्षकही हास्यजत्रेचे फॅन्स आहेत. विशाखा सुभेदार, ओमकार भोजने, गौरव मोरे, समीर चौगुले, वनिता खरात, शिवाली परब, नम्रता आवटे या सर्वांच्याच भुमिका या प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. सोशल मीडियावरही त्यांचे बरेच फॅन्स आहेत. यावेळी हास्यजत्राची संपुर्ण टीम प्राजक्ता माळीच्या वाढदिवसाला एकत्र आली होती. त्यामुळे सोशल मीडियावर महाराष्ट्राची हास्यजत्राचा फार ट्रेडिंग होती. यावेळी कलाकार, लेखक सर्व हास्यजत्राची टीम उपस्थित होती. काही दिवसांपुर्वीच त्यांनी अमेरिकेचाही दौरा केला होता. त्याचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.



यावेळी समीर चौघुलेनं प्राजक्ताचे औक्षण केले. त्याचसोबत तिच्यासाठी खास केकही आणला होता. सर्वांनी एकत्र तिचा बर्थेडे सेलिब्रेट केला. परंतु यावेळी नेटकऱ्यांनी गौरव मोरे कुठे आहे? असा प्रश्न विचारत त्यांना ट्रोल केले आहे. त्यामुळे त्यांची चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती. यावेळी चक्क गौरव मोरेला का बोलावलं नाही असा थेट नाराच नेटकऱ्यांनी सुरू केला होता. येत्या 14 ऑगस्टपासून महाराष्ट्राची हास्यजत्रा पुन्हा भेटीला येते आहे. सोबतच याचा एक व्हिडीओ प्राजक्ता माळी आणि सई ताम्हणकरनं शेअर केला होता. त्यातून प्राजक्ताच्या वाढदिवसाचाही योग जुळून आला होता. त्यामुळे हास्यजत्राची टीम एकत्र पाहायला मिळाली.