Nikhil Bane's One Love : छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा शो सगळ्यांना खळखळून हसवताना दिसतो. या कार्यक्रमात प्रेक्षक चांगली पसंती देताना दिसतात. या शोच्या एपिसोडमधील अनेक क्लिप्स या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराची एक वेगळी ओळख आहे. त्या सगळ्यांच्या चाहत्यांची संख्या ही फार मोठी आहे. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. या सगळ्यात महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातील एका अभिनेत्यानं कोकणातील एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा अभिनेता दुसरा कोणी नसून अभिनेता निखिल बने आहे. निखिल बनेनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यानं 'वन लव्ह' या गाण्याच्या सुरु असलेल्या ट्रेंडला फॉलो केलं आहे. त्याच ट्रेंडला फॉलो करत निखिलनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नारळाची झाडं, आंबा आणि कौलारू घरं या गोष्टी दिसत आहेत. तर या व्हिडीओच्या सुरुवातीला म्युजिक सुरु असताना निखिलनं नारळाची झाडं दाखवली आहेत. त्यानंतर जसं गाणं सुरु झालं. निखिलनं आंबा, मग काजू आणि मग फणस अशा अनेक गोष्टी दाखवल्या आहेत. हा व्हिडीओ शेअर करत निखिलनं कॅप्शन दिलं की 'कोकणचो One love'. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


निखिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. तर त्यावर नेटकऱ्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'आयुष्यात असलेलं एकमेव प्रेम.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'ट्रेंडला योग्य प्रकारे फॉलो केलं आहेस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'खरं कोकण.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'अरे भावा मी सुद्धा याच विषयावर व्हिडीओ बनवणार होतो. मनातलं ओळखलंस तू.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'करवंद पण या गाण्यात हवी होती.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'सवाल भाऊ खाऊन खाऊन दमत नाही आपण.' 


हेही वाचा : PK मध्ये कसा शूट झाला 'तो' न्यूड सीन! खुलासा करत आमिर म्हणाला, 'कॅप लावून...'


निखिलच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. तर काही दिवसांपूर्वी ‘बॉईज 4’ या चित्रपटात निखिल दिसला होता. आता निखिल आणखी कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.