Mahekk Chahal : सलमान खानच्या 'वॉन्टेड' चित्रपटात दिसलेली अभिनेत्री महक चहल सध्या छोट्या पडद्यावर एकता कपूरच्या 'नागिन' या मालिकेत दिसत आहे. महक चहल ही तिच्या फॅशन आणि हटके स्टाईलसाठी ओळखली जाते. महक चहलनं तिच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. महक चहल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत महक चहल चाहत्यांच्या संपर्कात राहते. दरम्यान, महक चहल ही आपल्या सगळ्यांचे मनोरंजन हिंदी मालिकेतून करत असली तरी देखील तिला हिंदी भाषा येत नाही. त्यावरून तिनं बऱ्याचवेळा टोमणे देखील ऐकले आहे. याविषयी महक चहलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महक चहलनं नुकतीच 'ईटाइम्स'ला मुलाखत दिली होती. यावेळी महकनं अनेक गोष्टींचे खुलासे केले. महक म्हणाली, 'नागिन आधी मी कवच या मालिकेत काम केलं होतं. ती मालिका मी फक्त दोन महिन्यासाठी केली होती, कारण मला दुखापत झाली होती आणि त्यानंतर मी मालिकेला वेळ देऊ शकत नव्हती. त्यामुळे मी मालिकेला संपूर्ण देऊ शकेल की नाही हे मला कळत नव्हतं.' 



पुढे हिंदी भाषा न येण्यावर महक म्हणाली, 'मी एका शीख कुटुंबातून आहे आणि माझा जन्म आणि बालपण हे नॉर्वेमध्ये गेलं. त्यामुळे माझी हिंदी चांगली नव्हती. मी कधी हिंदी भाषेचा अभ्यास केला नव्हता नाही कधी लिहीली होती. जेव्हा मला ही मालिका मिळाली तेव्हा मी स्वत: ला प्रश्न विचारला होता की मी हिंदी बोलू शकेल का? मला हिंदी येत नाही, मी हिंदी बोलू शकणार नाही. त्यानंतर मी एक हिंदी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांकडे क्लासेस घेतले, ते मला सेटवर स्पष्ट हिंदी बोलायला शिकवायचे.' 


हेही वाचा : लग्न नाही तर Salman Khan नं केलं होतं बाळाचं प्लॅनिग! अभिनेत्याचा खुलासा; म्हणाला "काही वर्षांपूर्वी..."


पुढे नागिनच्या ऑफरविषयी बोलताना महक म्हणाली, 'जेव्हा मला नागिनची ऑफर मिळाली तेव्हा माझ्या मित्रांनी मला सांगितले की होकार देऊन मी चुकी करत आहे. नागिन एक मोठी मालिका आहे आणि त्याचे आधीच 5 सीजन आले आहेत. त्यानंतर माझे मित्र माझी मस्करी करू लागले होते. जेव्हा त्या मालिकेसाठी मला निश्चित करण्यात आलं तेव्हा ते म्हणाले मी हे करू शकणार नाही. माझे मित्र माझी खिल्ली उडवत म्हणाले तुला हिंदी बोलता येत नाही आणि तू नागिनमध्ये काम करणार. त्यांना वाटलचं नव्हतं की मी एकवर्षे काम करू शकेल. त्यानंतर जेव्हा माझ्या कामाचा कौतुक करण्यात आलं तेव्हा मला आनंद झाला की मी मेहनत करत सगळं करून दाखवलं.'