आईच्या निधनानंतर `या` लोकप्रिय अभिनेत्याचे वडील रुग्णालयात दाखल!
या अभिनेत्यावर एका पाठोपाठ एक संकट येत आहेत.
Krishna Health Update: दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूचे वडील कृष्णा हे देशातील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच त्यांना हैदराबादच्या कॉन्टिनेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. परंतु सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा त्याच्या नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. सुपरस्टार कृष्णाला काही दिवसांपूर्वी पत्नी इंदिरम्मा यांच्या निधनानंतर अडचणींचा सामना करावा लागला. काळजी करण्यासारखे काही नाही कारण वयोमानाशी संबंधित समस्यांमुळे ते तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते.
टॉलिवूडचे प्रसिद्ध सुपरस्टार कृष्णा यांना 13 नोव्हेंबर रोजी कॉन्टिनेंटल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास सुरु झाला होता. रिपोर्ट्सनुसार, कृष्णा रूटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेला होते. मात्र त्यांची प्रकृती पाहता त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला देण्यात आला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णालयातील डॉक्टरांची टीम त्याची काळजी घेत आहे.
महेश बाबूच्या वडिलांनी अलीकडेच त्यांची पत्नी इंदिरा देवी गमावल्या आहेत. 2019 मध्ये त्यांची पहिली पत्नी विजया निर्मला यांचे निधन झाले. तेव्हापासून त्यांनी स्वतःला इंडस्ट्रीपासून लांब केले आणि त्यानंतर ते कोणत्याही कार्यक्रमात दिसले नाहीत. तथापि, ते नेहमी आपल्या मुला-मुलींच्या कौटुंबिक कार्यक्रमांना उपस्थित असतात.
कृष्णा यांचा मोठा मुलगा रमेश बाबू 8 जानेवारी 2022 रोजी दीर्घ आजारामुळे निधन झाले. नंतर 28 सप्टेंबर रोजी इंदिरा देवी यांचे निधन झाले. कृष्णा 79 वर्षांचे असून ते यशस्वी अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक आहेत. 2009 मध्ये ते पद्मभूषण पुरस्कार विजेते होते आणि त्यांनी आंध्र विद्यापीठातून डॉक्टरेटही पदवीही घेतली होती. ते त्यांचा कामात अभूतपूर्व होते आणि Cinemascope, 35mm, आणि Cowboy सारख्या चित्रपटांना तेलुगू चित्रपटसाठी ओळखले जातात.