Mahesh Babu ला मातृशोक; आईचं 70 व्या वर्षी निधन
आईच्या निधनाने Mahesh Babu कोलमडला
मुंबई : साउथ सिनेमाचा सुपरस्टार महेश बाबूने (Mahesh Babu) आयुष्यातील जवळच्या व्यक्तीला गमावलं आहे. महेश बाबूची आई इंदिरा देवी (Indira Devi) यांचं बुधवारी निधन झालं आहे. वयाशी संबंधित अनेक आजारांनी त्या त्रस्त होत्या. वयाच्या 70 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी इंदिरा देवी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारा दरम्यान त्यांचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इंदिरा देवी यांचं पार्थिव अंतिम दर्शनासाठी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत पद्मालय स्टुडिओमध्ये ठेवण्यात येणार आहे. (Mahesh Babu family)
बुधवारी दुपारी 1 वाजता महाप्रस्थानम येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. ज्येष्ठ अभिनेते कृष्णा यांच्या पत्नी आणि महेश बाबू यांच्या आई इंदिरा देवी यांचे निधन झाल्यामुळे कलाविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
काही महिन्यांपूर्वी अभिनेत्याच्या भावाचं निधन
वर्षाच्या सुरुवातीला महेश बाबूचा मोठा भाऊ रमेश बाबू यांचं देखील वयोमानाशी संबंधित आजारांमुळे निधन झालं. महेश दिग्गज अभिनेते कृष्णा आणि इंदिरा देवी यांच्या पाच मुलांपैकी चौथे आहेत.