Mahesh Babu च्या 11 वर्षाच्या लेकीनं दान केलं जाहिरातीतून मिळालेलं पहिलं मानधन!
Mahesh Babu`s daughter Sitara : महेश बाबूच्या लेकीनं केलेल्या कामाचं सगळ्यांचे केलं कौतुक. सितारानं तिच्या पहिल्या जाहिरातीतून मिळालेल्या मानधनाला दान केलं आहे. तर दुसरीकडे तिच्या नावानं एक पुस्तकही प्रकाशित केलं आहे.
Mahesh Babu's daughter Sitara : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबूचे लेक सितारा ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या जाहिरातीमुळे चर्चेत आहे. टाइम्स स्क्वेअरवर झळकणारी सितारा ही स्टार किड्स पैकी पहिली आहे. सितारानं एका ज्वेलरी ब्रॅंडसाठी 'प्रिंसेस' नावाची शॉर्ट फिल्म केली आहे इतकंच नाही तर तिनं यात अभिनयही केला आहे. तर सितारानं तिची आई नम्रता शिरोडकरसोबत हैद्राबादमधील एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये तिच्या नावावर एका पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. दरम्यान, एका वृत्तानुसार सितारानं तिला मिळालेलं मानधन हे चॅरीटीला दान केली आहे.
'आईएनएस' च्या रिपोर्टनुसार, सितारानं तिला ज्वेलरी ब्रॅंडमधून मिळालेल्या पहिल्या पगाराला दान केलं आहे. बूक लॉन्चवेळी सितारा म्हणाली की तिला चित्रपट पाहायला आवडतं आणि तिला अभिनय करायला आवडतं. तिला हा आत्मविश्वास तिच्या आईकडून मिळाला आहे. पुढे सितारा म्हणाली की, टाइम स्क्वेअरवर, लॉन्च करण्यात आलेल्या सिग्नेचर ज्वेलरी कलेक्शनला पाहून तिच्या वडिलांना म्हणजेच महेश बाबूला खूप आनंद झाला. जेव्हा त्यानं व्हिडीओ पाहिला तेव्हा तो भावूक झाला असं ती म्हणाली. या दरम्यान, नम्रता म्हणाली की तिचा मुलगा गौतम लवकरच चित्रपटांमध्ये पदार्पण करू शकतो. पण सध्या तो त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे.
सिताराचा टाइम्स स्क्वेअरवरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत महेश बाबूनं एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये महेश म्हणाला,“टाइम्स स्क्वेअरला झळकली. माझ्या फायरक्रॅकरचा अभिमान आहे. अशीच यशस्वी हो.” कॅप्शन दिलं आहे. तर नम्रतानं देखील इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत आमची लहान बेबी गर्लला इतकी मोठी झाली... सितारा खूप खूप प्रेम..." सितारा ही पहिली स्टार किड आहे जी टाइम्स स्क्वेअवर झळकली. सितारानं वयाच्या 11 व्या वर्षीच जान्हवी कपूर, सारा अली खानसोबत अनेक कलाकारांना मागे टाकलं आहे.
हेही वाचा : देशात टॉमेटो 200 च्या पार, अन् नेटकऱ्यांना आली Katrina Kaif ची आठवण!
रिपोर्ट्सनुसार, 11 वर्षाच्या सिताराला पहिलं मानधन म्हणून 1 कोटी रुपये मिळाले होते. तर या जाहिरातीसाठी ती पीएमजे ज्वेल्सची ब्रॅंड अम्बॅसिडर झाली. जेव्हा तिची जाहिरात टाइम्स स्क्वेअरवर दिसली तेव्हा तिनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिचा आनंद व्यक्त केला होता. सिताराच्या चाहत्यांविषयी बोलाचं झालं तर इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे 1.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. सितारानं तिचे वडील महेश बाबूसोबत 'पेनी' या चित्रपटातून डेब्यू केली. तर तिनं 'फ्रोजन 2' या चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनसाठी बेबी एल्साला आवाज दिला आहे.