मुंबई : बॉलीवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांनी रेडिओ शो वर ड्रग्ज अब्यूजसंबंधी माहिती दिली. नशेचे दुष्परिणाम यावेळी त्यांनी सर्वांना सांगितले. यासंबधी जागृकता पसरविण्यासाठी त्यांनी खूप सारे उदाहरण दिले. 


तेव्हापासून दारू नाही 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 जेव्हा त्यांची मुलगी पूजा भट्ट जन्माला आली तेव्हा ती रॉयल किड प्रमाणे होती. एकदा पूजाला लाडाने जवळ घेतले असता तिने तोंड फिरवले.


तेव्हापासून मी दारूला कधी हाथ लावला नसल्याचे महेश भट्ट यांनी सांगितले.


दारू ही माऊथवॉशप्रमाणे 


 महेश भट्ट यांनी यावेळी संजय दत्तचे उदाहरण दिले. संजय दत्त दारूच्या खूपच आहारी गेला होता. दारू ही त्याच्यासाठी माऊथवॉशप्रमाणे होती.


त्याच्या दिवसाची सुरूवात दारूनेच व्हायची. अशीही एक वेळ होती जेव्हा तो प्रत्येक क्षणाला हेरोइनसंबधीच विचार करायचा.


ड्रग्जच्या व्यसनातून बाहेर पडणं त्याच्यासाठी खूप कठीण होतं. 
 
 या शो बद्दल महेश भट्ट यांनी ट्विटरवर माहीती दिली.