Mahesh Bhatt On Extra Marital Affair: दिग्दर्शक महेश भट्ट हे कथेच्या आगळ्यावेगळ्या हाताळणीसाठी ओळखले जातात. त्यांनी दिग्दर्शित केलेले अनेक चित्रपटांनी एक काळ गाजवल्याचं प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेला 'अर्थ' हा चित्रपट 'सिलसिला' चित्रपटापासून प्रेरित असल्याचं सांगण्यात आलं होतं. या चित्रपटामध्ये अभिनेते कुलभूषण खरबंदा, शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. कुलभूषण खरबंदा यांचं शबाना आझमींशी लग्न झालेलं असतं. मात्र विवाहबाह्य संबंधांमुळे ते शबाना आझमीपासून वेगळे होऊन स्मिता पाटील यांच्यासोबत निवडतात असं या चित्रपटाचं कथानक आहे. 


तो दावा भट्ट यांनी खोडून काढला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'अर्थ' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी हा चित्रपट यश चोप्रांच्या 'सिलसिला'पासून प्रेरित असल्याचं म्हटलं. आजही 'सिलसिला' चित्रपट प्रचंड चर्चेचा विषय ठरतो तो त्यामधील स्टार कास्टमुळे आणि त्यांच्या खासगी आयुष्यातील घडामोडींमुळे. 'सिलसिला'मध्ये अमिताभ बच्चन, जया बच्च आणि रेखा यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. 'सिलसिला' 1981 मध्ये तर 'अर्थ' 1982 मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये महेश भट्ट यांनी 'अर्थ' चित्रपट 'सिलसिला'पासून प्रेरित असल्याचा दावा खोडून काढला आहे. आपलं मत मांडताना त्यांनी यश चोप्रांचा 'सिलसिला' चित्रपट हा सत्य आयुष्यापासून फार दूर होता असंही म्हटलं आहे. 


माझं करिअर संपणार असं वाटल्याने मी...


"मी माझ्या स्वत:च्या अनुभवांपासून प्रेरणा घेत 'अर्थ' चित्रपट बनवला होता. मी कधीच 'सिलसिला'वर टीका केलेली नाही. 'अर्थ' चित्रपट एक प्रयोग होता. मी बनवलेले पहिले चारही चित्रपट अपयशी ठरले होते. मी ते चित्रपट बाजारपेठेमधील मागणीनुसार तयार केले होते. मात्र दुर्देवाने त्यापैकी एकही चांगली कामगिरी करु शकला नाही. त्यामुळे आता माझं करिअर संपणार असं वाटत असताना मी हे सोडूनच जायचं आहे तर एखादा प्रयोग का करु नये? असा विचार करुन 'अर्थ' तयार करण्याचं ठरवलं. नशीबाने मला धोका पत्कारण्यास तयार असलेला निर्माता मिळाला," असं भट्ट यांनी 'रेडीओ नशा'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. 


नक्की पाहा हे फोटो >> दोघांत तिसरा.. डॉक्टरच्या एन्ट्रीने ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्यात दुरावा? 'ते' Photos चर्चेत


अनेकांनी मला हिणवलं


महेश भट्ट यांनी त्यावेळी यश चोप्रा मोठ्या स्तरावर बड्या कलाकारांसहीत चित्रपट तयार करत असल्याने अनेकांनी आपल्याला तू अपयशी दिग्दर्शक आहेस, असं म्हणत हिणवलं होतं अशी आठवणही सांगितलं. "मी 'अर्थ' चित्रपटाची निर्मिती करत असताना मला अनेकांनी तू अपयशी दिग्दर्शक असून अशा चित्रपट बनवतोय, असं म्हटलं होतं. यश चोप्रा हा फार मोठा बॅनर आहे. ते अमिताभ बच्चन, जया भादुरी, रेखा यांना मुख्य भूमिकेत घेऊन चित्रपट करत आहेत. मी त्यावेळी टीकाकारांना त्यांना बनवू द्या चित्रपट असं म्हणायचो," असं महेश भट्ट म्हणाले.


नक्की पाहा हे फोटो >> ...अन् संतापलेल्या संजय दत्तने सलमान खानचे दीड कोटी रुपये अरबी समुद्रात फेकले; पुढले 4 दिवस...


'विवाहबाह्य संंबंध असतात तेव्हा तुम्ही...'


विवाहबाह्य संबंध या एकाच विषयाकडे पाहण्याचा आपला आणि यश चोप्राचा दृष्टीकोन अगदी वेगळा होता असं महेश भट्ट यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. "मला काय म्हणायचं आहे की, तुमचे विवाहबाह्य संबंध असतात तेव्हा तुम्ही गार्डनमध्ये झाडांच्या आजूबाजूला नाचत नाही. ते एक प्रकारचं गुप्त नातं असतं ज्यामध्ये अवघडल्यासारखी भावना अधिक असते. ही भावना विचित्र असते याबद्दल मला खात्री होती कारण मी स्वत: ते अनुभवलं आहे. तुम्ही तुमच्या चित्रपटामध्ये थोडं खरं आयुष्य टाकता तेव्हा प्रेक्षक त्याच्याशी अधिक चांगल्या पद्धतीने जोडले जातात. त्यांना त्यामधील खरेपणा भावतो," असं महेश भट्ट यांनी मुलाखतीमध्ये दोन चित्रपट बनवताना दृष्टीकोन आणि तो बनवण्यामागील भावना अगदी वेगळी होती असं अधोरेखित करताना म्हटलं.