लेक पूजा भट्ट विषयी प्रश्न विचारताच महेश भट्ट म्हणतात, `मी आलियाचा फॅन...`
Mahesh Bhatt : महेश भट्ट यांची लेक पूजा भट्ट ही सध्या बिग बॉस ओटीटी या कार्यक्रमात असून तिच्याविषयी प्रश्न विचारता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष करता त्यांनी त्यावर आलियाचा उल्लेख करत मी अजून आलियाचा चाहता आहे असं म्हटलं आहे.
Mahesh Bhatt : बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट हे त्यांची लेक आणि अभिनेत्री आलिया भट्टच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपटाच्या स्क्रीनिंगला पोहोचले होते. या चित्रपटाच्या स्क्रीनिंग नंतर महेश भट्ट यांना बाहेर असलेल्या पापाराझींनी त्यांची मोठी लेक पूजा भट्टविषयी एक प्रश्न विचारला, ज्याकडे महेश भट्ट यांनी दुर्लक्ष केलं. इतकंच नाही तर त्यावर ते मी आलियाचा चाहता आहे असं म्हणाले.
खरंतर हा चित्रपट पाहून आल्यानंतर सगळ्यात आधी रणबीरनं आलियाच्या या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. त्यानंतर पुढे महेश भट्ट आले. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी सोनी देखील होत्या. यावेळी पापाराझींपैकी एकानं महेश भट्ट यांनी त्यांची मोठी लेक पूजाविषयी प्रश्न विचारला. पूजा आता बिग बॉग ओटीटीच्या घरात आहे. त्यावरून पापाराझींनी महेश भट्ट यांना प्रश्न विचारला की पूजा चांगलं खेळते की नाही? त्यावर महेश भट्ट म्हणाले कोण? त्यावर त्या पापाराझींनी पूजा भट्ट असं म्हटलं. त्यावर उत्तर देत महेश भट्ट म्हणाले मी अजूनही आलिया भट्टचा चाहता आहे. तर पूजा ही महेश भट्ट यांची आणि त्यांची पहिली पत्नी किरण भट्टची मुलगी आहे.
महेश भट्ट पुढे आलियाच्या अभिनयाविषयी म्हणाले की खूप अप्रतिम चित्रपट आणि तिचा अभिनयही खूप सुंदर आहे. तर पुढे आलियाची आई सोनी म्हणाल्या, शुक्रवारी सगळ्यांचं भरभरून मनोरंजन करण्यासाठी चित्रपटगृहात हा चित्रपट येत आहे. नक्कीच पाहा.
'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. तर धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी हे कलाकार सहकलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. इतकी मोठी स्टार कास्ट असल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना खूप उत्सुकता लागली आहे. तर या चित्रपटाचं दिग्दर्शन स्वत: करण जोहर करत आहे. त्यासोबत या चित्रपटाची निर्मिती धर्मा प्रोडक्शन करत आहे. या चित्रपटासाठी सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा मुलगा इब्राहिम अली खाननं असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले आहे. या चित्रपटाचं शूटिंग हे मुंबई, दिल्ली, रशिया आणि जम्मू आणि काश्मिरमध्ये झाले आहे. तर चित्रपटाला संगीतबद्ध हे प्रितम यांनी केलं आहे. हा चित्रपट उद्या म्हणजेच 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.