जगातला सर्वात लांब महामार्ग, 30000 किमी पर्यंत एकही यू-टर्न नाही... 14 देशांचा होतो प्रवास

Longest Highway : अनेक देशात राष्ट्रीय महामार्ग असतात जे लांबच लांब असतात. पण जगात असा एक रस्ता आहे जो तब्बल तीस हजार किलोमीटरचा आहे. विशेष म्हणजे या रस्त्याला कुठेही यू-टर्न नाही. या रस्त्यावरुन एकदा प्रवास सुरु केला की अनेक दिवस प्रवास सुरुच राहातो.

| Sep 18, 2024, 20:51 PM IST
1/7

जगातला सर्वात लांब महामार्ग, 30000 किमी पर्यंत एकही यू-टर्न नाही... 14 देशांचा होतो प्रवास

2/7

रस्ते, महामार्ग आणि एक्स्प्रेस वे हे त्या देशाच्या विकासाचे मुख्य मार्ग मानले जातात. ज्या देशात चांगले रस्ते तो देश तितका विकसनशील असं मानलं जातं. भारतातही रस्त्यांचं जाळं मोठ्या प्रमाणावर पसरत आहे. देशातल्या काना-कोपऱ्यात रस्त्यांचं जाळं पसरलं आहे. भारताचा सर्वात लांब महामार्ग NH 44 आहे जो कन्याकुमारी ते श्रीनगर असा जोडला जातो..

3/7

पण तुम्हाला माहित आहे का जगात असा एक महामार्ग आहे जो 14 देशांमधून जातो. या महामार्गावरुन एकदा प्रवासाला सुरुवात केली की अनेक दिवस हा प्रवास सुरुच रहातो. हा रस्ता तब्बल 30000 किमी लांब आहे. 

4/7

14 देशातून जाणाऱ्या या रस्त्याचं नाव आहे पॅन-अमेरिका हायवे (Pan-American Highway जगातला हा सर्वात लांब महामार्ग आहे. लांबीमुळे या महामार्गाचं नाव गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आलं आहे. हा महामार्ग उत्तर अमेरिकेपासून दक्षिण अमेरिकेतल्या अर्जेंटिनापर्यंत जातो. हा महामार्ग वाळवंट, बर्फाच्छादीत डोंगर, सपाट मैदानातून जातो. उत्तर, मध्य आणि दक्षिण अमेरिकेतल्या राज्यांना जोडण्याचा उद्देश हा महामार्ग बनवण्यामागे होता.

5/7

पॅन-अमेरिका महामार्गात  मेक्सिको, ग्वाटेमाला, एल साल्वाडोर, होंडुरस, निकारागुआ, कोस्टा रिका उत्तरी अमेरिकातला पनामा, कोलंबिया, इक्वेडोर, पेरू, चिली आणि अर्जेंटीना देशातून जातो. 30 हजार किमी लांब महामार्गाचा हा प्रवास अतिशय खडतर आहे. 

6/7

या महामार्गावर 30000 किमीपर्यंत एकही जोड रस्ता किंवा युटर्न नाही. म्हणजे एकदा या महामार्गावरुन प्रवास सुरु केला की हा प्रवास पूर्ण करण्यासाठी तब्बल 60 दिवसांचा कालावधी लागतो. या महामार्गावरुन प्रवास करणार व्यक्ती पूर्ण तयारीनिशी बाहेर पडतो. 

7/7

या महामार्गावरच्या प्रवासात अनेक आव्हानांना सामोरं जावं लागतं. पूर्ण 60 दिवासांच्या प्रवासाचं लक्ष्य ठेऊन सामान घेऊन जावं लागतं. शिवाय रस्त्यात कार बंद पडली तर मॅकेनिकची मदत घेण्यासाठी अनेक दिवसांची वाट पाहावी लागते.