Mahesh Manjrekar New Movie Poster : मराठीतील सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर हे सतत त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. सध्या ते वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटाच्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटापूर्वीच महेश मांजरेकरांनी त्यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. ही अनोखी गाठ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात अभिनेता श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टरही समोर आले आहे. 


नव्या चित्रपटाचे पोस्टरही समोर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेश मांजरेकर यांनी नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी ‘ही अनोखी गाठ’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याबरोबरच त्यांनी त्याचे पोस्टरही शेअर केले आहे. यात गौरी इंगवले ही श्रेयस तळपदेकडे प्रेमाने पाहताना दिसत आहे. या पोस्टरवर चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीखही लिहिण्यात आली आहे. 


महेश मांजरेकरांनी या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याला हटके कॅप्शन दिले आहे. झी स्टुडिओज् प्रस्तुत करीत आहेत, महेश मांजरेकर दिग्दर्शित एक नवी प्रेम कहाणी 'ही अनोखी गाठ'. 1 मार्च 2024 पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित, असे म्हटले आहे. 



श्रेयस तळपदे आणि महेश मांजरेकर पहिल्यांदाच एकत्र


या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करत आहेत. तर याची निर्मिती महेश मांजरेकर मुव्हिज आणि झी स्टुडिओजद्वारे केली जात आहे. यात श्रेयस तळपदे आणि गौरी इंगवले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा महेश मांजरेकर यांचीच आहे. तर चित्रपटाचे संवाद गणेश मतकरी यांचे आहेत. ‘ही अनोखी गाठ’ च्या निमित्ताने महेश मांजरेकर आणि श्रेयस तळपदे ही जोडी पहिल्यांदा एकत्र येत आहेत. हा चित्रपट १ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 


"झी स्टुडिओजसोबत या आधीही अनेकदा काम केले असून पुन्हा एकदा नवा चित्रपट घेऊन आलो आहे. श्रेयस आणि गौरी यांची केमिस्ट्री पाहणे औस्तुक्याचे ठरेल. हळूहळू चित्रपटातील गोष्टी समोर येतीलच" असे महेश मांजरेकर म्हणाले.