मुंबई : अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. ते आपल्या नव्या प्रोजेक्ट संदर्बातील माहिती इंटरनेटवर पोस्ट शेअर करत देत असतात.सलमान खानची मुख्य भूमिका असलेला अंतिम सिनेमा दिग्दर्शित केल्यानंतर आता मांजरेकर नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि झी स्टुडिओजची प्रस्तुती असलेला 'पांघरुण' (Panghrun) हा चित्रपट 11 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमातील कलाकारांबद्दल बोलायचं झालं तर, अमोल बावडेकर, गौरी इंगवले, रोहित फाळके, विद्याधर जोशी, सुरेखा तळवलकर हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 


 'काकस्पर्श', 'नटसम्राट' सारख्या यशस्वी कलाकृतीनंतर आता नवा सिनेमा रिलीजसाठी सज्ज आहे. त्यामुळे आता हेच समीकरण पांघरुणमधूनही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. स्वातंत्र्यपूर्वीचा काळ, कोकणाचं निसर्गसौंदर्य आणि तिथे घडणारी एक विलक्षण प्रेमकहाणी या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


या चित्रपटाच्या म्युझिकल ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. हितेश मोडक, डॉ. सलील कुलकर्णी, पवनदीप राजन आणि अजित परब यांचं संगीत आणि वैभव जोशी यांच्या शब्दांनी सजलेल्या या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. या सिनेमाचं मोशन पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.