Mahesh Manjrekar : लोकप्रिय मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर हे त्यांच्या कामामुळे नेहमीच चर्चेत असतात. महेश मांजरेकर हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी देखील ओळखले जातात. त्यांनी फक्त मराठी चित्रपटसृष्टी नाही तर बॉलिवूड चित्रपटसृष्टीतही चांगली कामगिरी केली आहे. दरम्यान, महेश मांजरेकर यांनी नुकतंच त्यांच्या मुलांच्या खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी मुलांनी जर त्यांना समलैंगिक असल्याचे सांगितले तर त्यावर त्यांच्या प्रतिक्रिया काय असेल हे सांगितले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महेश मांजरेकर यांनी नुकतीच टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत महेश मांजरेकरांनी समलिंगी संबंधावर वक्तव्य केलं. या मुलाखतीत महेश मांजरेकर यांना प्रश्न विचारण्यात आला की मराठी प्रेक्षक हे समलिंगी संबंधांवर असलेले चित्रपट पाहण्यासाठी तयार आहेत का? त्यावर उत्तर देत महेश मांजरेकर म्हणाली, "मराठी प्रेक्षकांना आपण कमी का लेखतो? ते समजूतदार, हुशार, आणि पुरोगामी आहेत. त्यांना समाजात त्यांच्या आजूबाजूला काय चालले आहे ते माहीत आहे. खरं बोलायचं झालं तर यापूर्वी मराठी चित्रपटांमध्ये असे बरेच प्रयोग झालेत. त्यामुळे मला असं वाटतं ते अशा प्रकारच्या चित्रपटांसाठी तयार आहेत."



समलिंगी नातेसंबंध स्वीकारण्यावर बोलताना महेश मांजरेकर म्हणाले "आपण प्रत्येक नातेसंबंध स्वीकारले पाहीजे. जेव्हा लोक ही नाती स्वीकारायला तयार होत नाहीत, तेव्हा अनेक समस्या वाढतात आणि मग अशात आत्महत्यासारखे प्रकार घडतात. आज जर माझा मुलगा मला येऊन मला म्हणाला की तो समलिंगी म्हणजे (गे) असून समलिंगी संबंधात आहे. तर मी हे स्वीकारेन. कारण ते त्याचं आयुष्य आहे. ही त्याची निवड आहे. एवढचं नाही तर माझ्या मुलीनेही मला हे सांगितलं तरी मी स्वीकारने. कारण मला त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगू द्यायचं आहे.”


हेही वाचा : Project K साठी मानधन म्हणून प्रभासनं घेतले 150 कोटी? निर्मात्यांचा मोठा खुलासा, म्हणाल्या...


दरम्यान, महेश मांजरेकर यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ते ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार दिसणार असून तो छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. याशिवाय, त्यांनी निर्मिती केलेल्या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर त्यांनी प्रशांत दामले यांच्या ‘एका काळेची मणी’ या कॉमेडी वेब सीरिजची निर्मिती केली होती. तर नसीरुद्दीन शाह यांच्याबरोबर ते ‘पुराना फर्निचर’मध्ये काम करणार आहेत.