धक्कादायक : विमानाला भीषण आग! प्रवास करत होती जय भानुशालीची पत्नी
सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि अभिनेता जय भानुशालीची पत्नी माही विज विमान अपघातातून बचावली आहे.
मुंबई : सुप्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि अभिनेता जय भानुशालीची पत्नी माही विज विमान अपघातातून बचावली आहे. नुकतंच माही विजने सांगितलं की, विमानाने प्रवास करत असताना तिच्या फ्लाइटला आग लागली. यावेळी तिच्यासोबत ति मुलगी तारा विजही उपस्थित होती. अशा परिस्थितीत ती आणि तिची मुलगी या भीषण अपघातातून थोडक्यात बचावली आहे. या वाक्याची व्यथा माही विजने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे माही विज सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. यादरम्यान माही तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक गोष्ट सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असते. दरम्यान, विमान दुर्घटनेतून बचावलेल्या माही विजच्या वेदना दिसून येत आहेत. ज्या अंतर्गत माही विजने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये माही विज तिची मुलगी तारासोबत हसताना दिसत आहे.
पण या हसण्याचं कारण म्हणजं दोघंही विमान अपघातातून सुखरुप बाहेर पडल्या आहेत. कारण माही विजने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, आयुष्यात कधी कधी काहीही होऊ शकं. टेक ऑफच्या काही सेकंद आधी विमानाच्या इंजिनमधून धूर निघताना दिसला. यानंतर मी सुन्न झाले आणि माझ्या मुलीकडे बघत राहिले यानंतर मी ताराचा हात धरला आणि सलमतीची प्रार्थना करू लागले. आम्हाला सुरक्षित ठेवल्याबद्दल इंडिगो एअरलाइन्सचे खूप खूप आभार, तारा, तू धन्य आहेस. प्रार्थना रंग आणतात, सर्वांचे आभार.
अपघात कधी झाला
खरंतर, माही विज तिच्या मुलीसोबत फ्लाइटने गोव्याला रवाना होणार होती. त्यानंतर टेक ऑफ करण्यापूर्वी विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने अचानक विमानाच्या इंजिनला आग लागली. मात्र, विमानातील पायलट आणि कर्मचाऱ्यांच्या समजुतीमुळे हा अपघात टळला.