`माझी तुझी रेशीमगाठ` मालिका रंजक वळणावर; थाटामाटात पार पडला नेहा आणि यशचा साखरपुडा
`माझी तुझी रेशिमाठ` या मालिकेत श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहे.
मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेने छोट्या पडद्यावर कमबॅक करत झी मराठीवरील माझी तुझी रेशीम गाठ यामध्ये दिसला आहे. 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे खूप वर्षांनंतर मालिकांमध्ये झळकला आहे. श्रेयससोबत अभिनेत्री प्रार्थना बेहरे मुख्य भूमिकेत आहे. या जोडीने पहिल्यांदाच एकत्र स्क्रिन शेअर केली आहे. छोट्या पडद्यावर या नव्या जोडीला प्रेक्षक प्रचंड पसंती देतात यात काहीच शंका नाही. या मालिकेत आता मोठं वळण येणार आहे.
माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत आता लवकरचं नेहा आणि यश यांचा साखरपुडा होणार आहे. मालिकेतील फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नेहा आणि यश यांच्यासोबत परीचा क्यूट लुक देखील समोर आला आहे. लाल फ्रॉक घातलेली परी फारच सुंदर दिसत आहे.
माझी तुझी रेशीगाठ मालिकेच्या मागील भागात नेहाच परीची आई असल्याचं सत्य यश आजोबांना सांगतो. हे सत्य ऐकून आजोबांना धक्का बसतो. तर नेहा देखील खाली कोसळते. मालिकेत पुढे काय झालं? यश आणि नेहाच्या साखरपुड्याला आजोबांनी होकार कसा दिला? मधल्या काळात यश नेहाच्या आयुष्यात नक्की काय झालं? ते साखरपुड्यापर्यंत कसे येऊन पोहोचले? हे जाणून घेण्यासाठी मालिका पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.