मुंबई : माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील शनाया तुम्हाला आठवतेय का?, आता या शनायाने आपला रिअल लाईफ जोडीदार निवडला आहे. आणि या जोडीने लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनाया म्हणजेच अभिनेत्री रसिका सुनील लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिने आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा एक गोड फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. 



शनायाच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आदित्य बिलागी आहे. तो एक डान्सर आहे. आदित्यने रसिकाला याआधीच विचारलं होतं. अगदी बॉलिवूड फिल्मी स्टाईलने त्याने रसिकाला प्रपोज देखील केलं होतं. 



आता ही जोडी विवाहबंधनात अडकणार असल्याने तिचे चाहते देखील खूश आहेत. सोबतच या फोटोवर अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.