Sunny Leone :  बॉलीवूडची अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) दुखापत ग्रस्त झाली आहे. सेटवरच मोठा अपघात झाला. यात सनी विओनी जखमी (injured) झाली आहे. तिचा पाय रक्तबंबाळ झाला आहे.  या अपघातामुळे सेटवरचे सर्वच भयभित झाले. या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला (Viral Video ) आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ सनी लिओनीने स्वतः तिच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.  पायातून रक्त वाहत असल्याने सनी लिओनी या व्हिडिओमध्ये खूपत घाबरलेली दिसत आहे. सेटवर उपस्थित असलेले लोक सनी लिओनीवर प्राथमिक उपचार करताना दिसत आहेत. या व्हिडिओ सोबत सनी लिओनीने एक पोस्ट देखील लिहीली आहे. या पोस्टमध्ये सनीने अपघाताबाबत माहिती दिली आहे. लवकरच सनी लिओनी कोटेशन गँग या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कोटेशन गँग या चित्रपटाचे शुटींग सुरु असताना हा अपघात घडल्याचे सनीने पोस्टमध्ये सांगितले आहे. 


या व्हिडिओ मध्ये सनी लिओनीच्या पायाच्या अंगठ्याला दुखापत झाल्याचे दिसत आहे. सेटवरचे तिचे सहकारी तिच्यावर प्रथोमचार करत आहेत. काही जण म्हणतात की आता तुला टीटॅनसचे इंजेक्शन घ्यावे लागेल. मात्र, इंजेक्शनचे नाव ऐकून सनी घाबरते. 


सनी लिओनीने इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. अनेकजण तिची खिल्ली उडवत आहेत. थोड्याशा दुखापतीचा सनी जास्तच बाऊ करत आहेत. सनी लवकर ठीक व्हावी अशी कमेंट करत अनेत चाहते तिची थट्टा करत आहेत. सनीच्या या व्हिडिओला अवघ्या दोन तासात  375,253 likes आले आहेत. इंस्टाग्रामवर सनीचे 54 मिलियन पेक्षा जास्त म्हणजेच 54 मिलियन फॉलोअर्स आहेत.


सर्वात बोल्ड अभिनेत्री अशी सनीची ओळख आहे. सनी लिओनीने एडल्ट चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.  बॉलिवूडमध्ये देखील सनीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.