मेकिंग ऑफ ठाकरे! पडद्यामागच्या रंजक कथा
बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित असलेला ठाकरे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
मुंबई : बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर आधारित असलेला ठाकरे हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी बाळासाहेबांची भूमिका साकारणार आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून मनसे नेते अभिजीत पानसे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. हिंदी आणि मराठी अशा दोन भाषेत या सिनेमाची निर्मीती होणार आहे. 2019च्या जानेवारीत ठाकरे हा सिनेमा प्रदर्शित होतोय.
या चित्रपटामध्ये उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची भूमिका कोण साकारणार याबाबत उत्सुकता अजूनही कायम आहे. तर माँसाहेबांची भूमिका अभिनेत्री अमृता राव साकारणार आहे. कृष्णा देसाई यांच्या भूमिकेत संजय नार्वेकर दिसणार आहे. तर इंदिरा गांधी आणि जॉर्ज फर्नांडिस यांच्या भूमिकाही या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाबद्दलच्या पडद्यामागच्या रंजक गोष्टी नवाजुद्दीन आणि संजय राऊत यांनी सांगितल्या आहेत.
व्हिडिओ : पडद्यामागच्या रंजक कथा