मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा कायम बॉयफ्रेन्ड आणि अभिनेता अर्जुन कपूरसोबत दिसते. पण आता ती बॉयफ्रेन्डसोबत नाही तर पहिला पती अरबाज खानसोबत दिसली आहे.  एकत्र वेळ व्यतीत करण्यासाठी संपूर्ण कुटुंब एकत्र आलं होतं. यावेळी मलायकाच्या कुटुंबातील सदस्य तिच्यासोबत होते. हे चित्र पाहून दोघांमध्ये सर्व काही चांगलं होण्याच्या मार्गावर आहे, अशी चर्चा त्यांच्या चाहत्यांमध्ये रंगत आहे. सध्या फॅमिली रियुनीयनचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान रंगत आहे. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका अरोराने रविवारी संपूर्ण कुटुंबासह जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी अरबाज आणि मलायकाचा मुलगा अरहान खान देखील त्यांच्यासोबत होता. जेवण झाल्यानंतर मलायका बाहेर निघाली. मलायकानंतर अन्य लोक बाहेर आली तेव्हा मलायाकाच्या आईने सर्वांच लक्ष वेधलं. मलायकाच्या आईने लेकीसोबत पोज दिली नाही तर अरबाजला मिठी मारली. 


सांगायचं झालं तर मलायका आणि अरबाज 2017 साली विभक्त झाले. त्यानंतर दोघे त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहे. अरबाज मॉडेल जॉर्जिया ऐंड्रयानीला डेट करत आहे तर दुसरीकडे मलायका आणि अभिनेता अर्जुन कपूर रिलेशनशिपमध्ये आहेत. महत्त्वाचं म्हणजे अर्जुन आणि मलायकाने त्यांच्या नत्याची कबुली दिली आहे.