मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा कायम प्रोफेशन आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. अनेकदा आपल्या हॉट आणि बोल्ड अदांनी चाहत्यांना घायाळ करणारी मलायका पुन्हा चर्चेत आली आहे. सध्या रंगणाऱ्या चर्चांना कारण देखील अत्यंत खास आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि अरबाज खानची पहिली पत्नी मलायका अरोरा आज वेगळे झाले असले तर एका कारणासाठी कायम एकत्र असातात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अरबाज-मलायकाचं  एकत्र येण्याचं कारण म्हणजे त्यांचा मुलगा अरहान खान. विभक्त झाल्यानंतर मलायका आणि अरबाज कितीही व्यस्त असले तरी मुलासाठी भक्कम उभे असतात. तिघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 



व्हिडीओमध्ये तिघे एका फ्रेममध्ये दिसत आहेत. अरहानला सोडण्यासाठी मलायका आणि अरबाज दोघे एकत्र आले होते. मलायका आणि अरबाज एकमेकांसोबत बोलत आहेत. तर अरहान त्यांच्या मित्राला भेटत आहे. 


त्यांच्या व्हिडीओवर अनेकांच्या कमेंट आणि लाईक्स येत आहेत.  काहींनी दोघांच्या पालकत्वाचं कौतुक केलं, तर काहींनी मात्र दोघांना तुम्ही भांडत आहात का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. 


मलायका आणि अरबाजच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, लग्नाच्या 19 वर्षांनंतर दोघांनी वेगळ राहाण्याचा निर्णय घेतला. आता दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. मलायका अभिनेता अर्जुनसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत.