मुंबई : बॉलिवूडची मुन्नी मलायका अरोरा तिच्या फिटनेस, डान्स, तिच्या पोस्टमुळे कायम चर्चेत असते. एवढच नव्हे तर ती कायम तिच्या पर्सनल लाईफमुळेदेखील बरीच चर्चेत असते. मग ती फिटनेसमुळे असो किंवा मग, अर्जुन कपूरसोबतची रिलेशनशिप असो. ४७ वर्षीय मलायका नेहमी जीमच्या बाहेर किंवा एअरपोर्टच्या बाहेर ग्लॅमरस लूकमध्ये स्पॉट होत असते. तिचे हे फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होत असतात. सोशल मीडियावर कायम अॅक्टीव्ह असणारी मलायका एका डान्स व्ही़डिओमुळे चर्चेत आलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच मलायका अरोरा एका डान्स रिअॅलिटी शोमध्ये हजेरी लावली होती. इथं मलायकाने तिच्या डान्सिंगची झलक दाखवली. तिच्या डान्स झलकवर इतकी प्रशंसा केली गेली की, प्रेक्षकदेखील तिच्या डान्सचे दिवाने झाले.



'ढोल बाजने लगा' या गाण्यावर डान्स रिअॅलिटी शोमध्ये मलायका नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस याच्यासोबत थिरकली. यावेळी मलायका आणि टेरेंसची केमिस्ट्री पाहण्यासारखी होती. या गाण्यावर मलायकासोबत थिरकण्यासाठी नृत्यदिग्दर्शक टेरेन्स लुईस याने कोरिओग्राफर गीता कपूर यांना एक खास विनंती केली. टेरेंसने गीता कपूरला मलायकाच्या डान्सचं दिग्दर्शन करायला सांगितलं. ज्यावर गीताने मलायकाला स्टेजवर येताना डान्सस्टेपचे सल्ले दिले.


मलायकाच्या डान्सस्टेप पाहिल्यानंतर शोमध्ये उपस्थित सर्व स्पर्धकांनी आणि प्रेक्षकांनी आपआपल्या ठिकाणी खुश होऊन थिरकण्यास सुरवात केली. आकर्षणाची बाब म्हणजे मलायका आणि टेरेन्स डान्सच्या शेवटी स्टेजजवळ जात होते. सर्वात ही मजेशीर गोष्ट पाहायला मिळाली.


यानंतर या डान्स रिअॅलिटी शोचे सगळे स्पर्धक त्यांच्याकडे आले आणि पुन्हा ते सगळेजण 'ढोल बाजने लगा' या गाण्यावर नाचू लागले. व्हायरल होणारा हा व्हिडिओ आतापर्यंत 32 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. तर, 34 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडीओला लाईक्स दिले आहेत.