मलायकाला रुग्णालयातून डिस्चार्ज, पण कुठे आहे अर्जुन कपूर?
अभिनेत्री मलायका अरोराचा शनिवारी कार अपघात झाला. त्यानंतर तिला तात्काळ पनवेल येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मुंबई : अभिनेत्री मलायका अरोराचा शनिवारी कार अपघात झाला. त्यानंतर तिला तात्काळ पनवेल येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मलायका अपघात झाल्यामुळे चाहत्यांनी अभिनेत्रीची चिंता सतावत आहे. मलायकाची प्रकृती आता स्थित आहे. मलायकाच्या अपघाताची बातमी कळताचं सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली. पण आता मलायका आता घरी देखील आहे.
मलायकासोबत झालेल्या रोड अपघाताची माहिती मिळताच अर्जुन कपूर अस्वस्थ झाला. सध्या अर्जुन कपूर आणि मलायकाची बहीण अमृता अरोरा मलायका सोबत आहेत. पापाराझी विरल भयानीने आपल्या नुकत्याच केलेल्या पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे
मलायकाच्या डोळ्याला दुखापत
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायकाच्या ड्रायव्हरचा ड्रायव्हिंग करताना तोल गेला आणि त्याची कार इतर तीन कारला धडकली. मलायकाच्या डोळ्याला दुखापत झाल्याचं वृत्त आहे. अपघातानंतर लगेचच तिला नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
एका वृत्तानुसार, मलाइकाला मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी रुग्णालयात नेलं आहे. मलायकाच्या कारची ज्या इतर तीन गाड्यांशी टक्कर झाली आहे. त्या त्याच कार्यकर्त्यांच्या असल्याचंही वृत्त आहे जे राज ठाकरेंच्या सभेला पुण्याहून मुंबईला जात होते.