मुंबई : बॉलिवूडची ब्युटी क्वीन मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायकाचे लाखो चाहते आहेत. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायकानं काल 23 ऑक्टोबर रोजी तिचा 49 वा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. त्यानंतर मलायकानं सोशल मीडियावर बोल्ड ड्रेस परिधान केलेला फोटो शेअर केला की आता तिनं लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये मलायकानं बॅकलेस ड्रेस परिधान केला असून ती बाल्कणीत बसल्याचे दिसत आहे. बाल्कणीत बसून मलायका उगवत्या सुर्याकडे पाहते. याशिवाय मलायकानं तिच्या बेडरूममधील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत एक वर्ष मोठी झाले...आधी पेक्षा जास्त आनंदी...युनिवर्स तुझे आभार... आता ही वेळ स्वत: ला ओळखण्यासाठी आहे, असे कॅप्शन दिले आहे. 



मलायकाच्या या फोटोवर कमेंट करत सेलिब्रिटींपासून नेटकऱ्यांनी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकानं काल तिच्या वाढदिवसाच्या पार्टीचे आयोजन केले होते. दरम्यान, या पार्टीत बड्या बड्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. (malaika arora crosses boldness limit on diwali wear revealing backless dress)