मलायका अरोराचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण! दिसणार `या` सिनेमाच्या आयटम साँग मध्ये
Malaika Arora: या गाण्यात बॉलिवूडच्या अभिनेत्रीला महाराष्ट्राचा लाडका अभिनेत्याने साथ दिली आहे.
'येक नंबर' या सिनेमाच्या पोस्टर लाँच पासूनच सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे. नुकतंच या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. ट्रेलर रिलीज झाल्यापसूच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. याच दरम्यान आता या चित्रपटातील भन्नाट टायटल साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. अजय-अतुल यांचे संगीत, जोनिता गांधीचा आवाज या टायटल साँगला लाभला आहे. एवढंच नाही तर या गाण्यात रॅप आहे जे सौरभ अभ्यंकर यांचे आहे. यासोबतच या गाण्याला अजून चार चांद लावायला बॉलिवूडची अदाकारा मलायका अरोराही आहे.
मलायकाचं मराठी सिनेसृष्टीत पदार्पण
अवघ्या बॉलिवूडला भुरळ घालणारी मलायका अरोरा या गाण्याच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. या रॅपसाँगमधून मलायका आपल्या अदाकारीने रसिकांना घायाळ करणार आहे. बॉलिवूडमध्ये अनेक हिट गाणी केल्यावर मलायका आता मराठीत धुमाकूळ घालायला तयार आहे.
लाडक्या अभिनेत्याची साथ
या गाण्यात बॉलिवूडच्या अभिनेत्रीला महाराष्ट्राचा लाडका अभिनेत्याने साथ दिली आहे. महाराष्ट्राचा बहुगुणी अभिनेता सिद्धार्थ जाधवही या गाण्यात दिसणार आहे. प्रत्येकाला ठेका धरायला लावणाऱ्या या गाण्यात सिद्धार्थ एका अनोख्या अंदाजात दिसत आहे. मलायका आणि सिद्धार्थला एकत्र पडद्यावर पाहाणे, म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे. खूप हॅपनिंग आणि एनर्जीने भरलेले हे गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रुळणारे आहे. तगडी टीम लाभलेले हे गाणे केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात धुमाकूळ घालणार असल्याचे दिसत आहे.
या गाण्याबद्दल संगीतकार अजय गोगावले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, "पूर्वी चित्रपटात हमखास आयटम साँग असायचे. हा प्रकार हल्ली जरा कमी झाला होता. मात्र पुन्हा एकदा आम्हाला येक नंबरच्या निमित्ताने आयटम साँग करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात आयटम साँग असले तरी ते विनाकारण नाही. कारण मुळात कथेची गरज होती. परंतु आपल्याकडे नृत्य म्हटले की मराठी ठेका, आपली एक मराठी शैली येते. परंतु आम्हाला यात काहीतरी वेगळे करायचे होते. त्यामुळे याचाच आधार घेत आम्ही रॅप, हिपहॉप पद्धतीने हे गाणे करण्याचा एक नवीन प्रयत्न केला आहे.''
अभिनेत्रीची निर्मिती
'येक नंबर'चे तेजस्विनी पंडित, वरदा नाडियाडवाला निर्माते आहेत. येत्या १० ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजेश मापुस्कर दिग्दर्शित या चित्रपटात धैर्य घोलप, सायली पाटील यांच्या प्रमुख भूमिका आहेत.