Malaika Arora : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही वडील अनिल मेहता यांच्या निधनानंतर सोशल मीडिया आणि लोकांच्या नजरेपासून दूर होती. मलायकाच्या वडिलांनी घराच्या बाल्कनितून उडी घेत आत्महत्या केली. त्यामुळे मलायका आणि तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. मलायका आता या सगळ्या घटनेतून हळू-हळू बाहेर पडताना दिसते आणि ती आता पुन्हा एकदा कामावर परतत आहे. मलायकानं त्यासाठी मेकओव्हर देखील केला आहे. वडिलांच्या निधनानंतर मलायकानं काल पहिल्यांदा सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकानं स्वत: कोणताही व्हिडीओ शेअर केला नाही. तर हेअरस्टायलिस्ट अमित यशवंतनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मलायका दिसत असून ती एका सलूनच्या मिरर समोर बसली आहे. त्याशिवाय अमित यशवंत हा तिचे केस ट्रिम करताना दिसत आहे. तिला पाहून चाहते तिचा पाठिंबा देत आहेत. मलायकाच्या वडिलांचे निधन होऊन 20 दिवस झाले आहेत. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

हेअरस्टायलिस्ट जेव्हा मलायका अरोराचे केस सेट करत होता तेव्हा मलाकानं मिररमध्ये पाहिलं आणि तिनं डोळे ब्लिंक करत फ्लाइंग किस दिली. या व्हिडीओवर चाहते कमेंट करत त्यांचा पाठिंबा दर्शवत होते. मलायकाचं हे कमबॅक पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. एका चाहत्यानं कमेंट करत 'ओएमजी, स्टनिंग अशी कमेंट केली आहे.' तर दुसरा नेटकरी म्हणाला, 'आमची प्रिसेंस.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'या वयात इतके सुंदर केस.' अशा अनेक कमेंट करत मलायकाला तिचे चाहते पाठिंबा देण्याचा प्रयत्न करत आहेत. मलायका अरोराचे वडील अनिल मेहतानं 11 सप्टेंबर 2024 ला आत्महत्या केली. पोलिसांनी सुत्रांना सांगितलं की ज्यावेळी ही घटना घडली. 


हेही वाचा : तृप्ती डिमरीने कुणाचे 5 लाख बुडवले? आता अभिनेत्रीनेच दिले स्पष्टीकरण, म्हणाली...


सीसीटीव्ही फुटेजमध्ये समोर आलेल्या घटनेनुसार, अनिल मेहता हे त्यांच्या घराच्या बाल्कनीमध्ये बसले होते आणि 10:30 ते 11:00 च्या दरम्यान, कथितपणे त्यांनी गॅलरीतून उडी घेतली. तर मलायका आणि तिच्या कुटुंबाच्या दु:खाच्या काळात तिच्यासोबत तिचा पूर्वाश्रमीचा पती अरबाज खान आणि त्याचं संपूर्ण कुटुंब पोहोचलं होतं. त्यासोबत बॉयफ्रेंड अर्जुन कपूर देखील त्यावेळी तिच्यासोबत दिसला होता.