Malaika Arora Marathi Look: जिम लुकमुळं नेहमी चर्चेत असलेल्या मलायका अरोराचा मराठमोळ्या लुक सध्या चर्चेत आहे. मलायका अरोरा सध्या तिच्या देसी लुकमुळं चर्चेचा विषय ठरत आहे. मलायकाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तीने पारंपारिक ट्रेडिशनल मराठमोळ्या अंदाजात दिसत आहे. नेहमी वेस्टर्न कपड्यांमध्ये दिसणारी मलायकाचा हा पारंपारिक व मराठमोळ्या अंदाजावर चाहत्यांनी कमेंट केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकाने इन्स्टाग्रामवर स्वतःच हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याखाली कॅप्शनदेखील तिने मराठीत लिहलं आहे. पारंपारिक ते अधिक सुंदर असं तिने म्हटलं आहे. या व्हिडिओत मलायका, पायात पैंजण, कपाळावर चंद्रकोर, केसांत गजरा असा अस्सल मराठमोळ्या पद्धतीने ती नटली आहे. मलायकाने काळी व सोनेरी रंगाचा घागरा आणि लाल रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. तिचा मेकअपदेखील सुंदर केला होता. 


मलायकाने झी मराठी अवॉर्ड 2023 सोहळ्यात खास हजेरी लावली होती. या कार्यक्रमात तिने गाण्यावर नृत्यदेखील सादर केले होते. मराठी आणि हिंदी या दोन्ही गाण्यावर तिने नृत्य केले होते. याच गाण्यासाठी तिने खास साजश्रृगांर केला होता. मलायका अरोरानं या कार्यक्रमात आपल्या नृत्यानं उपस्थितांची आणि प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत.  तिचा मराठमोळा अंदाज पाहून तर प्रेक्षकही खूप खुश झाले होते. 



मलायकाचा हा मराठमोळा लूक चाहत्यांनाही खूप आवडला आहे. नेहमी जिमच्या कपड्यात दिसणाऱ्या मलायकाला या अंदाजात पाहून चाहत्यांनी तिचे कौतुक केले आहे. एकाने म्हटलं आहे की, तु 50 वर्षांची अजिबात वाटत नाही, तर, एकाने अर्जून कपूरचे नाव घेत कमेंट केली आहे की, अर्जुन राव की मस्तानी बाई, खरं सांगितलं ना. तर, एकामे म्हटलं आहे की, तु खूपच सुंदर दिसत आहे. 


झी मराठी अवॉर्ड 2023 सोहळ्यात मलायकाच्या पाककौशल्याचीही झलक पाहायला मिळाली. तिने चक्क बेसनाचे लाडू बनवले आहेत. श्रेया बुगडेसोबत तिने हा गेम खेळला होता. ज्यात तिने आपलं पाककला कौशल्य दाखवले. यावेळी सलील कुलकर्णी यांच्याकडे पाहून ती म्हणते की, ''फक्त लड्डू देणार, पण मी नाही येणार हं.'' सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.