मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा सध्या चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वी अभिनेत्रीचा अपघात झाला होता आणि मलाइकाला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या या अभिनेत्रीने आज तिच्या अपघातानंतर पहिल्यांदाच तिची प्रतिक्रिया दिली. अभिनेत्रीची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांशी सतत संवाद साधणारी ही अभिनेत्री अपघातानंतर सोशल मीडियापासून दूर होती. मात्र, अपघातानंतर आज पहिल्यांदाच तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. तिचा फोटो शेअर करत तिने लिहिलं आहे की, 'झालेला अपघात एखाद्या चित्रपटातील सीनपेक्षा कमी नव्हता.


गेल्या काही दिवसांपासून घडलेल्या घटना अविश्वसनीय आहेत. यासोबतच अपघाताच्या वेळी रुग्णालयात पोहोचण्यासाठी मदत करणाऱ्या सर्वांचेही तिने आभार मानले आहेत. त्यावेळी माझी काळजी घेण्यासाठी मला रुग्णालयात नेणाऱ्या सर्वांची मी आभारी आहे. असं अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत म्हटलं आहे.



अपघातानंतर अभिनेत्री आता हळूहळू बरी होत आहे.  मलायका अरोरा एका फॅशन इव्हेंटमधून परतत असताना तिच्या कारला अपघात झाला  ज्यामध्ये ती जखमी झाली.  यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.