Malaika Arora अर्जुनपेक्षा 12 वर्षे नाही तर आहे दोन दशकांनी मोठी? व्हायरल व्हिडीओमुळे एकच चर्चा
Malaika Arora`s Real Age : मलायका अरोरा आणि तिच्या Ex -Husband अरबाज खानचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तिचं वय हा चर्चेचा विषय ठरला आहे. मलायका ही अरबाज पेक्षाही वयानं दोन वर्षे मोठी आहे तर बॉयफ्रेंड अर्जुन कपूर पेक्षा दोन दशकांनी मोठी आहे.
Malaika Arora's Real Age : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही अभिनय क्षेत्रात सक्रिय नसली तरी देखील तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. पण बऱ्याचवेळा मलायका सोशल मीडियावर चर्चेत येण्याचे कारण तिचं अभिनेता अर्जुन कपूरसोबत असलेलं रिलेशनशिप आहे. अर्जुन आणि मलायका या दोघांमध्ये 12 वर्षांचा फरक असल्याचे म्हटले जाते. पण खरंच त्या दोघांमध्ये 12 वर्षांचा फरक आहे का? आता तुम्हाला वाटत असेल की असं आम्ही असं का म्हणत आहोत तर मलायका एका मुलाखतीत तिच्या खऱ्या वयावर बोलली होती. तिचं खरं वय काय हे ऐकूण तुम्हालाही नक्कीच धक्का बसेल.
मलायकाचा एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. मलायकाचा हा व्हिडीओ साजिद खानच्या एका शोमधील आहे. या व्हिडीओत मलायका तिचा एक्स पती म्हणजेच अरबाज खानसोबत दिसली होती. यावेळी साजिदनं त्या दोघांना अनेक प्रश्न विचारले होते त्याच दरम्यान, साजिद खान मलायकाला विचारतो की "तू अरबाज पेक्षा वयानं दोन वर्षानं मोठी आहेस त्याचं त्याला काय वाटतं." त्यावर उत्तर देत मलायका म्हणली "की त्याला ते आवडतं." मलायकाचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिचं नक्की वय काय या प्रश्नानं सगळ्यांना कन्फुज केलं आहे. त्याच कारण हे आहे की विकीपीडियानुसार अरबाज खानचं वय ही 55 वर्षे आहे. त्याप्रमाणे जर मलायका ही अरबाज पेक्षा वयानं दोन वर्षे मोठी आहे तर तिचं वय हे 57 होईल ना. पण विकीपीडियानं दिलेल्या माहितीनुसार मलायकाचं वय हे 49 आहे. त्यामुळे मलायकाच्या वयात हा 8 वर्षांची गडबड आहे.
The actual age of Malaika Arora.
by u/hailyou2022 in BollyBlindsNGossip
मलायका आणि अरबाजच्या या जुन्या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर कमेंट करत तिचं नक्की वय काय आहे असं म्हटलं आहे तर एका नेटकऱ्यानं कमेंट करत म्हटलं की जर ती 57 वर्षांची आहे तर व्वा तरी किती हॉट दिसते.
हेही वाचा : Sara Ali Khan शिवभक्तीत तल्लीन, ट्रोलर्स का म्हणतायत, "वडिलांनी संस्कार दिले असते तर..."?
मलायकाच्या रिलेशनशिपविषयी बोलायचे झाले तर ती आणि अर्जुन कपूर यांचे काही फोटो आहेत. मलायकानं रविवारी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अर्जुनचा एक फोटो शेअर केला होता. हा अर्जुनचा न्यूड फोटो होता. त्यानंतर अर्जुननं एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली होती.