मुंबई : 18 वर्षांचं नातं मोडून मलायका अरोरा आणि अरबाज खान यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्यांचा घटस्फोट 11 मे 2017 रोजी झाला. घटस्फोट होऊन आता जवळपास अडीच वर्षे झाली तरी ही या दोघांची चर्चा बॉलिवूडमध्ये कायम असते. दोघंही आपल्या नात्यात पुढे निघून गेले आहेत. पण घटस्फोट घेण्याच्या आदल्या रात्री नेमकं काय झालं? याचं उत्तर अनुत्तरितच होतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकाने घटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय झालं? ही गोष्ट एका कार्यक्रमात सांगितली होती. याची पुन्हा आज चर्चा होत आहे. 18 वर्षांचं नातं विसरून अरबाज आणि मलायकाने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्यांचा मुलगा अरहान अवघा 16 वर्षांचा होता. या दोघांनी घटस्फोट घेतल्यानंतरही चांगले मित्र म्हणून वावरताना दिसतात. 


घटस्फोटानंतर मलायका अरोरा करिना कपूरच्या 'व्हॅट व्युमन वाँट' (What Women Want) या शोमध्ये गेली. इश्क 104.8 FM वर प्रसारित झालेल्या या कार्यक्रमात मलायकाला तिच्या घटस्फोटाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी तिने घटस्फोटाच्या आदल्या रात्री नेमकं काय झालं? याचा गौप्यस्फोट केला आहे. 


मलायकाने जेव्हा तिच्या कुटुंबाला आणि मित्र परिवाराला घटस्फोटाचा निर्णय सांगितला तेव्हा सर्वात प्रथम त्यांनी 'पुन्हा एकदा विचार कर' असा सल्ला दिला. 'मला असं वाटतं, सगळ्यांची पहिला प्रतिक्रिया हीच होती की, असं नको करूस. कुणी तुम्हाला सांगत नाही की, हो हो प्लीज जा आणि घटस्फोट घे. ते पहिल्यांदा सांगतात की, जो निर्णय घ्यायचा आहे तो अगदी विचारपूर्वक घे.' मी सुद्धा या सगळ्यातूनच गेली असं मलायकाने सांगितलं. 


त्याचप्रमाणे तिच्या कुटुंबियांनी घटस्फोट घेण्याच्या आदल्या रात्री देखील यावर विचार कर असं सांगितलं. अगदी त्या रात्री संपूर्ण कुटुंब मलायकासोबत बसलं. पुन्हा त्यांनी तिला तोच प्रश्न केला,'तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस. तु्झ्या निर्णयावर 100% ठाम आहेस का? याचा विचार कर.' जवळच्या व्यक्तींकडून सतत हे ऐकणं खूप कठीण असल्याचं मलायका सांगते. पुढे ती असं म्हणते की, जे तुमची काळजी घेतात. ज्यांना तुमच्याबद्दल वाटतं ते हे असं बोलणारचं अस देखील मलायका सांगते. 


यानंतर तिच्या जवळच्यांनी म्हटलं की,'तू खरंच अरबाजसोबतच नातं संपवू इच्छितेस. तर आम्ही तुझ्यासोबत आहोत. कारण तुझ्या डोळ्यात तो विश्वास आहे आणि तू खंबीर स्त्री आहेस', असं म्हणतं माझ्या जवळच्यांनी मला आणखी पाठिंबा दिल्यासं मलायका सांगते.