Malaika Arora and Arjun Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. मलायका अरोराच्या कामापेक्षा तिचं खासगी आयुष्य हे चांगलंच चर्चेत असतं. गेल्या काही दिवसांपूर्वी वडिलांच्या निधनाच्या बातमीमुळे आणि त्या आधी अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपमुळे मलायका चर्चेत आली होती. दरम्यान, जेव्हा मलायकाच्या वडिलांचं निधन झालं तेव्हा पूर्णवेळ अर्जुन हा तिच्यासोबत दिसला होता. त्यानंतर दोघांमध्ये सगळं काही ठीक आहे अशा चर्चा रंगू लागल्या होत्या. दरम्यान, मलायकानं असं काही केलं आहे जेव्हापासून लोकांना त्यांचं नेमकं रिलेशनशिप स्टेटस हे काय आहे ते जाणून घ्यायचं आहे.  मलायकाच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर ती अगदी शांत झाली होती. खरंतर तिच्या वडिलांनी आत्महत्या करणं हे तिला किंवा कोणालाही अपेक्षित नव्हतं. तिला या सगळ्याचा मोठा धक्का बसला. दरम्यान, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिनं पश्चाताप आणि तिच्या निवडीविषयी सांगितलं. तिच्या या वक्तव्यानंतर प्रेक्षक त्याचा थेट संबंध हा अर्जुन कपूरशी जोडत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका अरोरानं ही मुलाखत ‘ग्लोबल स्पा मॅगझीन’ ला दिली आहे. या चर्चेत तिचे निर्णय आणि आवडीविषयी ती बोलली आहे. मलायका अरोरा म्हणाली, माझ्या खासगी आयुष्यात आणि कामात मी जे काही निवडलं, त्या सगळ्यानं माझ्या आयुष्याला आकार दिला आहे आणि त्याचं कारणामुळे मी कोणत्याही पश्चातापाशिवाय जगत आहे आणि स्वत: ला भाग्यशाली समजत आहे. त्याचमुळे सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच समोर येत आहेत. ही गोष्ट कळल्यानंतर आता लोकांना वाटतंय की मलायकानं हे वक्तव्य करत थेट अर्जुन कपूरवर इशारा केला आहे. 



मुलाखती दरम्यान, मलायकानं सांगितलं की 'आयुष्य हे खूप दगदगिचं आहे आणि काम तर तुम्हाला करायचंच आहे, जे जगजाहिर आहे. माझ्यासाठी अशा प्रकारची लाइफस्टाइल तशीच टिकवून ठेवणं खूप गरजेच आहे, तरच मी या टॉप ऑफ द गेममध्ये टिकून राहिल. मी रोज प्रत्येक गोष्टीसाठी माझं डेली रुटीन फॉलो करते मग सकाळी लवकर उठणं, वर्कआऊट करणं किंवा काही ठराविक गोष्टी खाणं आणि आराम करणं आहेत.'


हेही वाचा : 'सलमान फुटपाथवर गाडी चालवत होता आणि तेव्हा...', कोणत्या अभिनेत्यानं सांगितला 1998 चा किस्सा


मलायकानं पुढे सांगितलं की 'तुमचं आरोग्य आणि तुमची लाइफ स्टाइल दोन्ही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मी या गोष्टीवर लक्ष ठेवते की माझ्या डोक्याच्या शांततेसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. अर्थातच त्यासोबत माझ्या शरिरासाठी कोणती गोष्ट ही फायदे कारक आहे. मग त्यात स्वत: ची काळजी घेणं झालं, वर्कआऊट करणं झालं किंवा मग मेडिटेशन करणं झालं. गरजेची गोष्ट ही आहे की तुम्ही त्यावर लक्ष केंद्रित करा ज्या मानसिक, शारिरीक आणि भावनिकदृष्ट्या तुम्हाला संतूलन देतील.'