मुंबई : गेल्या काही दिवसांपासून चित्रपट जगतामध्ये एक मोठा संघर्ष सुरु असल्याचं पाहायला मिळालं आहे. हा संघर्ष दोन मोठ्या कलाविश्वांमध्ये आहे. दाक्षिणात्य आणि हिंदी अशा दोन्ही जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळणाऱ्या या कलाविश्वांमध्ये नाही म्हटलं तरीही अस्तित्वाचीच लढाई सुरु आहे, असं वातावरण सध्या दिसतंय असं म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. (Allu Arjun pushpa)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विविध कलाकार या मुद्द्यावर त्यांची मतं मांडत असतानाच अभिनेता अल्लू अर्जुन याच्या प्रतिक्रियेचीही प्रतिक्षा सर्वांनाच होती. 


'पुष्पा' या चित्रपटातून अल्लू अर्जुन मध्यवर्ती भूमिकेत झळकला. फक्त दक्षिणेकडेच नव्हे तर संपूर्ण भारत आणि जगभरात या चित्रपटाचा डंका वाजला. असं असतानाही अद्यापही या अभिनेत्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही, ही बाबही इथं विसरुन चालणार नाही. 


दरम्यान, हिंदी आणि दाक्षिणात्य कलाविश्वामध्ये पडलेल्या या वादाच्या ठिणगीत आता या अभिनेत्यानं त्याचं मनत सांगत सर्वांच्याच नजरा वळवल्या. काही मुद्दे त्यानं प्रकर्षानं व्यक्त केले. जे पाहता आतातरी हा वाद मिटणार का, हाच प्रश्न चाहत्यांनी विचारला. 


काय म्हणाला अल्लू अर्जुन ? 
दोन्ही कलाजगतांना त्यानं महत्त्वं दिलं. दोन्ही कलाविश्वांच्या कार्यपद्धतीमध्ये बरंच महत्त्वं असल्याचं त्यानं सांगितलं. बॉलिवूडमध्ये कथानकांना महत्त्वं देत विविध धाटणीचे चित्रपट साकारले जातात. 


तर, दाक्षिणात्य कलाजगतामध्ये विविध धाटणीचे चित्रपट साकारले जातात. पण, चित्रपट कोणताही असो त्यामध्ये मिर्च- मसाला, डान्स या साऱ्याचा समावेश असतोच. पण, बॉलिवूडमध्ये मात्र कथानकाला सर्वतोपरी प्राधान्य दिलं जातं, असं तो म्हणाला. 


अतिशय समर्पक आणि तितकंच लक्षवेधी उत्तर देत कोणालाही कमी न लेखत या अभिनेत्यानं सर्वांच्या मनातलं स्थान आणखी भक्कम केलं.