Malaika Arora Travelled In Train: बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या हॉट आणि बोल्ड लुकने सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत असते. ती नेहमी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. अशातच आता अभिनेत्रीची इन्स्टाग्राम स्टोरी चर्चेत आली आहे. स्टोरी पाहून चाहते देखील थक्क झाले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्री मलायका अरोराने रेल्वेतून प्रवास करतानाचा फोटो शेअर केला आहे. फोटोत मलायका अरोरा ही नाईट ड्रेसमध्ये  दिसत आहे. तसेच तिच्या चेहऱ्यावर फेस मास्क देखील दिसत आहे. सध्या तिचा हा फोटो प्रचंड व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायका अरोरा नेहमी तिच्या फिटनेसची काळजी घेताना दिसते. आता देखील ट्रेनमध्ये मलायका तिच्या चेहऱ्याची काळजी घेताना दिसली. 


मलायका अरोराचा रेल्वेतून प्रवास


बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोराने तिच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. ज्यामध्ये ती रेल्वेच्या स्लीपर क्लास कोचमधून प्रवास करताना दिसत आहे. त्यासोबतच तिच्या या पोस्टमध्ये टेबलवर लंच बॉक्स आणि टिशू पेपर देखील दिसत आहे. यावेळी प्रवासात मलायका अरोराने चेहऱ्यावर फेस मास्क लावला आहे. फेस मास्क लावून ती सेल्फी घेताना दिसत आहे. तिने हा फोटो शेअर करताना #IndianRailways सोबत मेक इट पॉश. असं म्हटलं आहे. तिच्या या पोस्टने चाहते देखील थक्क झाले आहेत.   



सोशल मीडियावर देखील मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय झाली आहे. मलायका नेहमी चाहत्यांसाठी वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते. काही दिवसांपूर्वीच तिने नोव्हेंबर महिन्यातील चॅलेंज शेअर केले होते. 


मलायकाचे नोव्हेंबरमधील चॅलेंज


मलायका अरोराने काही दिवसांपूर्वी तिचे नोव्हेंबरमधील चॅलेंज शेअर केले होते. ज्यामध्ये दारू न पिणे, आठ तासांची झोप पूर्ण करणे, प्रत्येक दिवशी व्यायाम करणे आणि तसेच रोज दहा हजार पाऊले चालणे, रोज सकाळी 10 वाजेपर्यंत उपवास ठेवणे, प्रोसेस्ड फूड न खाणे, रात्री 8 नंतर काहीही न खाणे आणि काही लोकांपासून दूर राहण्याचा निर्णय तिने घेतला आहे.