मलाइकाचा सर्वात मोठा Weakness, अर्जुन कपूर नाही तर ही व्यक्ती?
मलायका कुणासोबत घालवेतय क्वालिटी टाईम?
मुंबई : मलायका अरोरा तिच्या व्यावसायिक आयुष्याव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी ओळखली जाते. मलायकाने कायमच आपल्या आयुष्यात नेहमीच धाडसी निर्णय घेतले. खान कुटुंबाची सून बनणे असो किंवा 19 वर्षांनंतर लग्न मोडून 10 वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्याला डेट करणे असो. मलायकाला लाइमलाइटमध्ये राहावे लागते. आता अभिनेत्रीशी संबंधित आणखी एक बातमी येत आहे, ज्यामध्ये दावा केला जात आहे की अर्जुन सोडून ती आता कोणाकोणासोबत क्वालिटी टाइम घालवत आहे.
मलायका आणि अरबाजचा घटस्फोट
मलायका अरोरा ही सलमानचा भाऊ अरबाज खानची पत्नी. या दोघांनी समजतुदारपणे घटस्फोट घेतला आहे. आता दोघांचा घटस्फोट झाला असून दोघेही आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत.
घटस्फोटानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करू लागली आहे. तर अरबाजही अनेकदा परदेशी मॉडेल जॉर्जियासोबत दिसतो. मलायका अर्जुन यांच्या लग्नाची देखील चर्चा जोरदार आहे.
पण सध्या अर्जुनचे शेड्युल खूपच बिझी आहे. अर्जुन त्याच्या प्रोजेक्ट्समुळे सतत परदेशात राहतो, त्यामुळे दोघांनाही एकत्र वेळ घालवण्याची संधी मिळत नाही. त्यामुळे आता मलायका दुस-या व्यक्तीसोबत चांगला वेळ घालवत आहे.
मुलासोबत घालवला वेळ
मलायका ज्या व्यक्तीसोबत वेळ घालवत आहे. ती व्यक्ती म्हणजे तिचा मुलगा अरहान. अरहान नुकताच भारतात परतला आहे, जो आजकाल त्याची आई मलायकासोबत राहत आहे.
अरबाजपासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा तिच्या घरी एकटीच राहते. अशा परिस्थितीत मुलगा अरहान परदेशातून सुट्टीवर परतल्यावर त्याला कंपनी मिळाली आहे.
वास्तविक सध्या परदेशात नाताळच्या सुट्ट्या सुरू आहेत. त्यामुळे अरहान त्याच्या कुटुंबीयांना भेटायला आला आहे. मलायका अर्जुन किंवा अरबाज दोघांसोबतही नाही तर तिचा मुलगा अरहानसोबत वेळ घालवत आहे.
मलायका अरोरा सोनी टीव्हीवर प्रसारित होणाऱ्या 'इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 2' ला डान्स रिऍलिटी शो जज करताना दिसत आहे. त्याच्यासोबत टेरेन्स लुईस आणि गीता कपूरही या शोला जज करत आहेत.
इन्स्टाग्रामवर मलायकाच्या फॅन फॉलोइंगची जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. अभिनेत्रीला 14 मिलियन फॉलोअर्स फॉलो करतात आणि ती 576 लोकांना फॉलो करते.