मलायका अरोरा फाटलेल्या जीन्समधून बाहेर पडली, तिने अॅब्स दाखवण्याची संधी सोडली नाही!
मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या किलर लूकसाठी ओळखली जाते. ती मंडे मूडमध्ये बाहेर पडली खरी, पण तिच्या फोटोचीच जास्त चर्चा होऊ लागली आहे.
मुंबई : मलायका अरोरा (Malaika Arora) तिच्या किलर लूकसाठी ओळखली जाते. तिचे चाहते तिच्या प्रत्येक फोटोवर कमेंटस् करताना दिसत असतात. तिचे फोटो चाहत्यांना नेहमीच पसंत पडत आहेत. आता तिचा असा एक फोटो व्हायरल होत आहे. ती मंडे मूडमध्ये बाहेर पडली खरी, पण तिच्या फोटोचीच जास्त चर्चा होऊ लागली आहे. अलीकडेच अभिनेत्री मलायका पुन्हा एकदा आपल्या कपड्यांसह इंटरनेटचा पारा वाढविला आहे. ( malaika arora flaunted her abs with ripped jeans and crop top)
मलायकाचा हटके पोशाख
मलायका अरोरा (Malaika Arora) हिने नुकतेच इंस्टावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मलायकाची स्टाईल खूपच आकर्षक दिसत आहे. मलायकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिने राखाडी क्रॉप टॉप आणि खाली फ्लेयर्ड पॅन्ट परिधान केलेली आहे आणि ही पॅन्ट मधूनच फाटली आहे. या आउटफिटकडे पाहून असे दिसते की मलायका एकदम थंडीच्या मूडमध्ये आहे.
मलायकाने हे कॅप्शन लिहिलेय
फोटो शेअर करताना मलायका अरोराने (Malaika Arora) लिहिले आहे- 'मास्क, फाडलेली जीन्स, क्रॉप टॉप, हा माझा सोमवारचा मूड आहे. आपला लूक पूर्ण करण्यासाठी मलायकाने निळ्या रंगाचे स्पोर्ट्स शूज घातले आहेत आणि आपले केस खुले ठेवले आहेत. मलायकाची हा नवा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. मलायकाची फिटनेस या संपूर्ण वेषात स्पष्ट दिसत आहे.
वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत
मलायका अरोरा तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील चर्चेत राहिली आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बर्याच काळापासून चर्चेत आहेत. दोघांनीही आपल्या नात्याला दुजोरा दिला आहे. मलायका सोशल मीडियावर फोटो शेअर करत आहे, यावर अर्जुन कपूर यांच्या कमेंट्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले.
लग्नाचा काही प्लान नाही!
मलायका अरोरा (Malaika Arora) अलीकडेच अर्जुनच्या आगामी 'भूत पोलीस' सिनेमाच्या सेटवर दिसली होती. याशिवाय दोघांनाही बर्याचदा एकत्र स्पॉट केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मलायका आणि अर्जुनच्या लग्नाच्या बातम्यांनाही वेग आला. पण मलायकाने या वृत्तांना अफवा म्हटले होते.