चित्रपटसृष्टीपासून लांब तरी Malaika Arora महिन्याला कमावते इतके कोटी, आकडे ऐकून तुम्हालाही बसेल मोठा धक्का
Malaika Arora ला प्रेक्षक तिच्या डान्स आणि फॅशनसाठी ओळखतात. मलायकाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. चित्रपटसृष्टीपासून लांंब असणाऱ्या मलायकाची एकून संपत्ती ऐकूण तुम्हाला बसेल धक्का...
Malaika Arora Net Worth : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मलायका ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. मलायका ही चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी ती कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या मलायका तिचा शो 'मूव्हिंग इन विथ मलायका'मुळे (Moving In With Malaika) चर्चेत आहे. नेहमी अभियन, डान्स करणारी मलायका इतक्या वर्षांपासून चित्रपटसक्रिय नसताना ती इतकं आलिशान आयुष्य कसं जगते असा प्रश्न सगळ्यांना आहे. चला तर आज तिच्या एकूण संपत्तीविषयी जाणून घेऊया...
मलायकानं आता पर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यातून मलायकानं कोटींची संपत्ती कमावली आहे. आयटम नंबरसाठी लोकप्रिय असलेल्या मलायकाच्या एकूण संपत्तीचा आकडा ऐकून तुम्हालाही बसेल धक्का.
रिपोर्ट्सनुसार, मलायकाची संपत्ती ही जवळपास 100 कोटींच्या आसपास आहे. मलायका महिन्याला 70 लाख ते 1.5 कोटी रुपये कमावते. आता तुम्हाला प्रश्न असेल की मलायका इतके पैसे कसे कमावते. मलायका रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाचे काम करते. एका एपिसोडचे परिक्षण करण्यासाठी मलायका 6 ते 7 लाख रुपये घेते. याशिवाय मुंबईत तिचा एक योगा स्टुडिओ देखील आहे. मलायकाच्या या योगा स्टुडिओमध्ये अनेक सेलिब्रिटी योगा क्लासेससाठी येतात. यासोबतच मलायका एका फूड स्टार्टअपची मालक आहे जी निरोगी राहण्यासाठी कोणत्या गोष्टींचे सेवन केले पाहिजे यासाठी प्रोत्साहन देते.
मलायकाही ब्रँड एंडोर्समेंट करून कोटी रुपये कमावते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मलायकाचा मुंबईत एक आलिशान फ्लॅट आहे. मलायकाच्या या फ्लॅटची किंमत सुमारे 14 कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते.
दरम्यान, मलायका गेल्या काही दिवसांपासून तिच्या 'मूव्हिंग इन विथ मलायका' या शोमुळे ट्रोलिंगची शिकार झाली आहे. मलायकानं यावेळी तिची खासगी लाइफ सगळ्यांसमोर आणली आहे. मलायकानं या शोमध्ये सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंंतीस उतरल्या नाही आहेत. नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत ती गोव्यातील एका रेस्टॉरंटच्या बार काऊंटवर उभी राहून डान्स करताना दिसते. या व्हिडीओवरून मलायकाला प्रचंड ट्रोल करण्यात आले आहे.
मलायकाचा हा व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. इतकेच काय तर कोणत्या गोष्टी करायच्या हे देखील तिला कळत नाही. याशिवाय तिच्या अशा करण्यामुळे इतरांवर याचा काय परिणाम होतो हे तिला कळायला हवं असे काही लोकांचे म्हणणे आहे.