Malaika Arora workout video : फिटनेसच्या बाबतीत मलायका अरोरा नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. निरोगीपणा आणि फिटनेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन नेहमी तिच्या जीवनशैलीतून दिसून येतो. कारण ती सोशल मीडियावर तिच्या टिप्स करण्यात कधीही अपयशी ठरत नाही.  पुन्हा एकदा मलायकाने तिच्या नवीन फिटनेस व्हिडीओसह वर्कआउट केला आहे. तिने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती तिच्या एब्सवर काम करताना दिसत आहे. हा तिचा आतापर्यंतचा सर्वात कठीण एब्स वर्कआउट आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री मलायका अरोरा ही नेहमी तिच्या चाहत्यांना फिटनेस आणि आरोग्याबाबत जागरुक करताना दिसत असते. ती नेहमी चाहत्यांसाठी वेगवेगळ्या वर्कआउटचे व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. यावेळी देखील मलायकाने तिच्या चाहत्यांना सांगितले आहे की, ती एक वर्कआउट करत आहे. जो खूपच आवघड आहे. ती म्हणाली की हा आतापर्यंतचा सर्वात कठीण वर्कआउट आहे. जो करण्याचा मी प्रयत्न मी करत आहे. 


मलायकाने केला सर्वात कठीण वर्कआउट


अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर वर्कआउटचा व्हिडीओ शेअर करताना 'AB fab…' असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओमध्ये ती योगामॅटवर पडलेली दिसत आहे. तिचे शरीर थोडेसे बाजूला झुकलेले आहे. मलायकाचा एक हात जमिनीवर आहे तर दुसरा हात तिच्या डोक्यावर आहे. तर तिचे पाय जमिनीच्या वर आहेत. अशा प्रकारे ती तिच्या शरीराला V आकार बनवते. 


पाहा व्हिडीओ


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मलायकाच्या नवीन वर्कआउटचं कौतुक


सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये मलायका सर्वात कठीण वर्कआउट करताना दिसत आहे. मलायका नेहमी तिचे वेगवेगळ्या प्रकारचे वर्कआउटचे व्हिडीओ चाहत्यांना शेअर करत असते. मलायकाच्या नवीन वर्कआउट व्हिडीओवर देखील चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी तिचा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक जणांनी तिचे कौतुक देखील केलं आहे.