मुंबई : सोशल मीडियावर कोन कधी आणि कसा ट्रोल होईल, सांगता येत नाही, कारण सोशल मीडियावर प्रत्येक दिवशी कुणी ना कुणी ट्रोल होत असतं.


मलायका अरोडा ट्रोल


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री मलायका अरोडा देखील ट्रोल होत आहे. हे पहिल्यांदा नाहीय की लोकांनी मलायकाला ट्रोल केलं. मलायका या आधी देखील अनेक वेळा आपल्या ड्रेसमुळे ट्रोल झाली आहे.


ड्रेसअप स्टाईलवर निशाणा


यावेळी अभिनेत्री मलायका अरोडाने केलेली ड्रेसअप स्टाइल ट्रोल होत आहे. मलायका अरोडाने तिच्या घरी गुरूवारी पार्टी आयोजित केली होती, ख्रिसमस पार्टी होती, या पार्टीत तिचा मित्र परिवार होता, यात करिश्मा कपूर, करीना कपूर, तिची बहिणी अमृता अरोडा या दिसत आहेत. या सर्व गर्ल गँगमध्ये फिल्ममेकर करण जोहर देखील बसला होता.


फारच छोटे कपडे घातले


पार्टीत मलायकाने घातलेला ड्रेस लोकांना आवडला नाही, त्यांनी मलायकावर कमेंटस आणि ट्रोल करणं सुरू केलं. एका  फोटात मलायका करण जोहरजवळ बसलेली होती. तिचे कपडे खूपच लहान दिसत होते. हेच लोकांना आवडलं नाही, हे ट्रोलवरून दिसून येतं.


मलायकाला सोडून येथे सर्वजण


युजर्सच्या कमेंट्स या फोटोत लोकांनी स्पष्ट लिहिलं आहे, मलायका फारच वेगळी दिसतीय, चांगली दिसत नाहीय, तर एका युजर्सने लिहिलंय, मलायकाला सोडून येथे सर्वजण डिसेंट दिसत आहेत.