Malaika Arora Video : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा (Malaika Arora) ही चित्रपटांमध्ये सक्रिय नसली तरी देखील तिचे लाखो चाहते आहेत. मलायकाला छैया छैया गर्ल म्हणून आजही बरेच लोक ओळखतात. मलायका ही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे आपण पाहतो. दरम्यान, नुकताच मलायकाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत चित्रपट निर्माता रितेश सिधवानीनं चुकून मलायकाचा हात पकडला आहे.  (Malaika Arora Viral Video) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मलायकाचा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत मलायका, निर्माता रितेश सिधवानी आणि त्याची पत्नी दिसत आहे. ते तिघंही घरी जायला निघतात. रितेश फोनवर बोलत असताना चुकून त्याच्या बायकोच्या जागी मलायकाचा हाथ पडकतो. खरंतर त्याच्यापाठी मलायका असते. तर त्याला वाटतं की त्याची पत्नी आहे. पण मलायकाच्या मागी डॉली होती. रितेशच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा त्यानं लगेच मलायकाचा हाथ सोडला आणि तिच्या मागे असलेली त्याची पत्नी डॉलीचा हाथ पकडला. दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मलायकाच्या या व्हायरल व्हिडीओवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, चुकून मलायकाचा हाथ पडकला. दुसरा नेटकरी म्हणाला, गलती से मिस्टेक पर दिल गार्डन गार्डन होगया. तिसरा नेटकरी म्हणाला, अर्जुन कपूर बोलत असेल की कोणाची हिंमत्त झाली. आणखी एक नेटकरी म्हणाला, हे मस्त झालं. तो म्हणत असेल चूकून लॉट्री लागली. दुसरा नेटकरी म्हणाला, ती काही बोलली नाही. तिसरा नेटकरी म्हणाला, मला वाटलं तिनं साडी नेसली आहे पण... आणखी एक नेटकरी म्हणाला, मलायकाचा हाथ पकडण्याची त्याची इच्छा होती, पण नंतर दादानं त्याचा पत्नीचा हाथ पकडला. 


हेही वाचा : Sonalee Kulkarni आता थेट साऊथमध्ये झळकणार, चित्रपटाचं पोस्टर केलं शेअर


दरम्यान, मलायका ही नेहमीच तिचा बॉयफ्रेंड आणि अभिनेता अर्जुन कपूरमुळे चर्चेत असते. त्या दोघांना नेटकरी सोशल मीडियावर ट्रोल करताना दिसतात. त्या दोघांना ट्रोल करण्याचं कारण त्या दोघांचा वयाचा असलेला फरक. मलायका अर्जुनहून वयानं मोठी आहे त्यामुळे ते दोघं नेहमीच ट्रोल होत असतात. दरम्यान, रिपोर्ट्सनुसार, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकानं खुलासा केला की दुसऱ्या लग्नाचा विचार करते. (Malaika Arora and Arjun Kapoor)