मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये मलायका तिच्या जिम ट्रेनरसोबत वर्कआउट करताना दिसत आहे आणि या वर्कआऊट सेशनसाठी तिला ट्रेनरची मदत घ्यावी लागत असल्याचं दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये अभिनेत्रीचा ट्रेनर तिला स्ट्रेचिंग करण्यासाठी मदत करत आहे. मलायकाच्या या जबरदस्त वर्कआऊटवर चाहते फिदा झाले आहेत. 


या व्हिडिओमध्ये ती अगदीच बोल्ड अंदाजात दिसत आहे. पण जिममध्ये जाऊन मलायका अरोरा काय करते? हे तिच्या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. ती फिट ठेवण्यासाठी किती मेहनत घेते हे देखील या व्हिडिओमुळे समोर आलं आहे.


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


मलायकाच्या वर्कआऊट लूकबद्दल बोलायचे झाले तर ती निऑन शॉर्ट्स आणि स्पॉट्स ब्रामध्ये दिसत आहे. व्हिडिओत ती हेडस्टँड करताना दिसत आहे. तिचा लूक अनेकांना आकर्षित करणारा ठरत आहे. 


तिचा व्हिडिओ आगीसारखा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.