मुंबई : अभिनेत्री मलायका अरोरा नेहमी तिच्या फिटनेस व्हिडिओंमुळे चर्चेत असते. ती तिच्या आयुष्यातील घडमोडी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना कळवत असते. सोशल माडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. ती स्वत:चे व्हिडिओ आणि फोटो कायम सोशल मीडियावर पोस्ट करत करत असते. सध्या तिचा टॉपलेस फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. १८ वर्ष जुना असलेल्या तिच्या टॉपलेस फोटोवर चाहत्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिच्या घायाळ अदांशिवाय अभिनेता अर्जुन कपूर अणि मलायकाच्या नात्याच्या चर्चा देखील चांगल्याच रंगत असतात. दोघांनी त्यांच्या नात्याची कबूली दिली आहे. त्याचप्रमाणे संजय कपूरच्या अगोदर अनिल कपूरने देखील मलायका-अर्जुनच्या नात्यावर मोहर लावली होती. त्यांनी म्हटलं होतं की, अर्जुन खूष असेल तर आम्हाला काय त्रास आहे? 


ती नेहमी तिच्या फिटनेस बद्दल ओळखली जाते. त्याचप्रमाणे तिचे नृत्य कौशल्य देखील फार चांगले आहे. मलायका तिच्या दिलखेच अदा आणि नृत्य कौशल्याने चाहत्यांना घायाळ करत असते.