Joju George Injured : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणिरत्नम आणि कमल हसन हे सध्या ठग लाइफ या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारा मल्याळम अभिनेता जोजू जॉर्जला गंभीर दुखापत झाली आहे. या चित्रपटाच्या शूटींगदरम्यान स्टंट करताना त्याला दुखापत झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, ठग लाईफ या चित्रपटाचे शूटींग सध्या पुद्दुचेरी येथे सुरु आहे. या चित्रपटासाठी अभिनेता जोजू जॉर्ज याचे शूटींग सुरु होते. यादरम्यान तो एक जोखीम असलेला स्टंट करत होता. या स्टंटमध्ये हेलिकॉप्टरचा समावेश होता. अचानक हा स्टंट करत असताना त्याला दुखापत झाली आणि त्याच्या डाव्या पायाचे हाड मोडले. 


डाव्या पायाला फ्रॅक्चर


यानंतर जोजू हा कोचीमध्ये परतला आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्याच्या पायाचा एक्स रे करण्यात आला. यावेळी डॉक्टरांच्या मते त्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाले आहे. त्यामुळे त्याच्या पायाला प्लास्टर करण्यात आले. त्याला पुढील काही आठवडे आराम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत त्याच्या पायाला फ्रॅक्चर करण्यात आल्याचे दिसत आहे. तसेच तो काठीच्या सहाय्याने चालत असल्याचे पाहायला मिळत आहे. 


दरम्यान गेल्या काही दिवसांपासून 'ठग लाईफ' या चित्रपटातील कलाकार आणि संपूर्ण क्रू हे पद्दुचेरी या ठिकाणी शूटींग करत आहेत. या ठिकाणी त्यांच्या महत्त्वाच्या दृश्यांचे शूटींग केले जात आहे. या चित्रपटाचे पुढील चित्रीकरण हे युरोपमध्ये होणार आहे. या ठिकाणी सिम्बू, त्रिशा आणि कमल हसन शूटींग करणार आहेत. 


'ठग लाईफ' चित्रपटात कमल हसन यांची मुख्य भूमिका


मणिरत्नम दिग्दर्शित 'ठग लाईफ' हा चित्रपट एक गँगस्टर अॅक्शन ड्रामा आहे. कमल हसन आणि मणिरत्नम यांनी या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिली आहे. त्यासोबतच कमल हसन हे या चित्रपटात मुख्य भूमिकाही साकारत आहेत. यात सिलंबरासन उर्फ सिम्बू, त्रिशा, जोजू जॉर्ज, ऐश्वर्या लक्ष्मी, नासर, अशोक सेलवन आणि पंकज त्रिपाठी झळकणार आहेत. त्यासोबत यात एआर रहमान याचे संगीत असणार आहे.