Minu Muneer: मल्याळम चित्रपट अभिनेत्री मीनू मुनीरने मुख्य कलाकार एम मुकेश आणि जयसूर्या यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला.मीनू मुनीरन यासंदर्भात फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. मीनू यांच्या पोस्टमुळे मल्याळम सिने इंडस्ट्री हादरली आहे. सोशल मीडियात हे प्रकरण खूप चर्चेत आले आहे. वाढता दबाव पाहून मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी रविवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक बोलावली आणि महिला कलाकारांवर होणाऱ्या अत्याचाराच्या चौकशीसाठी सात सदस्यीय अधिकाऱ्यांची विशेष टीम तयार केली आहे. 


परवानगीशिवाय चुंबन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुकेश, मनियानपिल्ला राजू, इडावेला बाबू आणि जयसूर्या या चार अभिनेत्यांनी 2013 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर माझ्यावर शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार केल्याचा आरोप मिनूने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केला. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला खूप वाईट अनुभव आला. मी टॉयलेटमध्ये जाऊन बाहेर आले तेव्हा जयसूर्याने मला मागून मिठी मारली आणि माझ्या परवानगीशिवाय माझे चुंबन घेतले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मला धक्का बसला आणि मी तिथून पळ काढला. माझ्यासोबत राहण्यास तयार असेल तर मी तूला आणखी काम देईन, असे त्याने म्हटल्याचा आरोप तिने केला. 


सदस्यत्वाच्या बहाण्याने शोषण 


दुसऱ्या एका घटनेत, अभिनेत्रीने असोसिएशन ऑफ मल्याळम मूव्ही आर्टिस्ट (AMMA) चे सचिव इदावेला बाबू यांच्याकडे सदस्यत्वाच्या अर्जासाठी संपर्क साधला होता. फिल्म असोसिएशनच्या सदस्यत्वासाठी अर्ज करण्याच्या बहाण्याने त्यांनी मला आपल्या फ्लॅटवर बोलावून शारीरिक शोषण केल्याचे तिने सांगितले. सत्ताधारी सीपीआय(एम) आमदार अभिनेते मुकेश यांनी माझा प्रस्ताव नाकारुन मला सदस्यत्व देण्यास नकार दिला होता.


मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोषण 


मल्याळम फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप शोषण होत आहे. मी त्याची प्रत्यक्षदर्शी आणि बळी आहे. मी चेन्नईला गेले तेव्हा कोणीही माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. तूला काय झालंय? असे मला कोणी विचारले नाही, असे ती आपल्या पोस्टमध्ये म्हणाली.मुनीरने पुढे लिहिले की, '2013 मध्ये एका प्रोजेक्टवर काम करत असताना या व्यक्तींकडून माझे शारीरिक आणि शाब्दिक शोषण झाले. मी सहकार्य करण्याचा आणि काम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, पण गैरवर्तन सहन करण्याच्या पलीकडे गेले. शेवटी मला मल्याळम चित्रपट सोडण्यास भाग पाडले गेले. 


आरोपाला दिले प्रत्युत्तर 


एका वृत्तपत्रातील लेखात मी या अत्याचाराच्या विरोधात लिहिले होते. माझ्यावर झालेला आघात आणि वेदनांसाठी मी त्यांच्या विरोधात कारवाई करण्यासाठी मदतीची मागणी करत आहे.मुनीरने आरोप केलेल्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता मनियानपिल्ला राजू ने याला प्रत्युत्तर दिले आहे. मुनीरच्या आरोपांमागे स्वार्थ असून आरोपांची चौकशी करण्याची मागणी त्याने केली आहे. काही लोक परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात. आरोपींमध्ये निर्दोष आणि दोषी असे दोन्ही पक्ष असतील. त्यामुळे सर्वसमावेशक तपास आवश्यक असल्याचे ते म्हणाले. 


तातडीने कारवाईची अपेक्षा


मी वारंवार तपास यंत्रणांला आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला आहे. माझ्यासोबत काय घडले हे पुन्हा पुन्हा सांगणे फार कठीण आहे. दररोज नवीन समित्या तयार होत आहेत.  मला आता केंद्र आणि राज्य सरकारकडून तातडीने कारवाईची अपेक्षा आहे. असे तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.