मुंबई : अरबाज खान पासून वेगळी झाल्यानंतर आता मलायका सध्या अर्जून कपूर सोबत रिलेशनशीपमध्ये आहे. दोघेही बऱ्याच वेळेपासून एकमेकांच्या प्रेमात आहेत. पण त्यांनी अजूनही लग्न केलेलं नाही. मलायका सध्या अनेक ठिकाणी स्पॉट होत असते. आपल्या ड्रेसमुळे ही ती सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिने पुन्हा एकदा बोल्ड अवतारात स्पॉट झाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसापूर्वी तिचे ब्लॅक टॉप फोटो व्हायरल झाले होते, ज्यामध्ये ती ओप्स मोमेंटची शिकार झाली होती. आता याच दरम्यान मलायका असा ड्रेस घालून बाहेर आली आहे, ज्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. फोटो पाहून तर तिच्या चाहत्यांना ही घाम फुटला. 


मलायका अरोरा या फोटोंमध्ये पिवळ्या रंगाचा बोल्ड ड्रेसमध्ये दिसत आहे. तिचा हा ड्रेस पाहिल्यानंतर अनेकांनाच्या भूवया उंचावल्या आहेत.  ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.



या फोटोंमध्ये मलायका अरोराने घातलेला ड्रेस खूपच टाइट दिसत आहे. तिच्या चाहत्यांना तिचा हा ड्रेस आवडला आहे. मलायका अरोरा या फोटोंमध्ये तिची स्टाइल दाखवताना दिसत आहे.



एकीकडे चाहते मलायकाच्या या ड्रेसची जोरदार प्रशंसा करत आहेत, तर दुसरीकडे ट्रोल देखील करत आहेत. मलायका अरोराचे हे फोटो पाहिल्यानंतर कोणीही म्हणू शकत नाही की ती 48 वर्षांची आहे.