मुंबई : मलायका अरोरा बॉलीवूडची आयटम क्वीन म्हणून ओळखली जाते. 'कांटे' सिनेमामध्ये 'माही वे' गाण्यावरील तिचा डान्स आजही सर्वांच्या चांगलाच लक्षात राहिला असेल. ती कोणत्याही टिव्ही शो मध्ये जाते तेव्हा तिला पोल डान्स दाखविण्याची मागणी केली जाते. 


एमटीव्ही शो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलीवूडमधल्या काही निवडक एक्ट्रेसनाच चांगला पोल डान्स करता येतो, त्यामध्ये मलायकाचे नाव आहे.


गेल्या शनिवारी मलायकाने एमटीव्ही शो इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल सीजन ३ मध्ये आपला जलवा दाखवला.


वय वर्ष  @४४ 


मलायकाच्या 'कांटे' ला आता अनेक वर्षे उलटून गेली आहेत. ती आता ४४ वर्षाची झाली आहे.पण हा पोल डान्स पाहून वयाचा कोणता परिणाम दिसत नसल्याचे सिद्ध होते.  ती इंडियाज नेक्स्ट टॉप मॉडेल सीजन ३ ची परीक्षक होती. 


हॉट अंदाज 



पोल डान्सिंग स्किल्स आणि लवचिकतेच्या आधारावर यामध्ये मुलींची निवड करण्यात येत होती. त्यावेळी मलायकाने आपले टॅंलेंट आपला हॉट अंदाज आणि मूव्जने दाखवून दिले.