मुंबई : आपल्या बोल्ड स्टाइल आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री मल्लिका शेरावतने 'कास्टिंग काउच'वर अनेकदा आपलं मत मांडलं आहे. स्वतःचं अनुभव शेअर केले आहेत. पुन्हा एकदा मल्लिका शेरावतने कास्टिंग काउचबाबत मोठा खुलासा केला आहे. कास्टिंग काउचमुळे तिच्या करिअरवर परिणाम झाल्याची कबुली मल्लिकाने एका मुलाखतीत दिली होती.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी तडजोड करण्यास नकार दिल्याने 'ए' लिस्टमधील सर्व कलाकारांनी माझ्यासोबत काम करण्यास नकार दिल्याचं मल्लिकाने सांगितलं होतं. अभिनेत्री म्हणाली की,  हे स्पष्ट आहे की, तिला अशा अभिनेत्री आवडतात ज्या तडजोड करण्यास तयार नसतात. मी त्यांच्यापैकी नाही. माझं व्यक्तिमत्व तसं नाही. मला स्वतःला कोणाच्याही हाती सोपवायचं नाही.


तडजोड म्हणजे काय हे स्पष्ट करताना मल्लिका पुढे म्हणाली की,  जेव्हा तुम्हाला म्हटलं जातं बस, तेव्हा तुम्हाला काहीजण उठ म्हणतात. पहाटे तीन वाजता अभिनेत्याने तुम्हाला त्याच्या घरी बोलावलं तर तुम्हाला जावं लागेल. जर तुम्ही त्या गटात असाल, तर तुम्ही त्याच्यासोबत चित्रपट करत असाल आणि तुम्ही त्यांच्या आमंत्रणावर जाण्यास नकार दिला तर तुम्हाला त्या चित्रपटातून बाहेर काढलं जाईल.


विशेष म्हणजे शेरावतने 2004 मध्ये मर्डर या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली, पण हळूहळू तिने हिंदी चित्रपट करणं बंद केलं, जेव्हा तिला याचं कारण विचारण्यात आलं तेव्हा शेरावतने सांगितलं की, मी माझं सर्वोत्तम दिलं. मी चांगल्या भूमिका शोधण्याचा प्रयत्न केला. आपल्या सर्वांप्रमाणे माझ्याही काही चुका झाल्या आहेत. काही भूमिका चांगल्या होत्या. काही इतक्या चांगल्या नव्हत्या. हा सर्व एका अभिनेत्याच्या प्रवासाचा एक भाग आहे पण एकूणच हा एक अद्भुत प्रवास होता.


मल्लिका म्हणाली की, मी हरियाणाची आहे. मी 'मर्डर'  सिनेमा केला जो खूप लोकप्रिय झाला. त्यामुळे जॅकी चॅनने मला त्याच्या चित्रपटात कास्ट केलं. मी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बराक ओबामा यांना दोनदा भेटले. त्यांनीही माझं कौतुक केलं. जवळपास दोन दशकांच्या चित्रपटसृष्टीच्या प्रवासात मला मिळालेल्या संधींमुळे मी खूप खूश आहे.


मल्लिका शेरावतने 2004 मध्ये मर्डर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तिने 2005 मध्ये 'द मिथ', 2010 मध्ये 'हिज', 2011 मध्ये 'पॉलिटिक्स ऑफ द लव्ह', 2016 मध्ये 'टाइम रायडर्स' असे सिनेमे दिले. ब-याच काळानंतर मल्लिका रजत कपूर दिग्दर्शित 'RK/RKAY' मध्ये गुलाबोच्या भूमिकेत दिसली. या चित्रपटात गुलाबोच्या व्यक्तिरेखेला चांगलीच पसंती मिळाली आहे.